प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सॅटॅलाइट व रॉकेट मेकिंग मिशनमध्ये विश्वविक्रम 

प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सॅटॅलाइट व रॉकेट मेकिंग मिशनमध्ये विश्वविक्रम 

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नपूर्तींसाठी प्रिन्सच्या विद्यार्थ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग

परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआररोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी डॉ.एपीजे अब्दुल कलाम स्टुडन्ट सॅटॅलाइट मेकिंग वेहिकल मिशन 2023 यामध्ये सहभागी होऊन गिनीज बुक व इंडिया बुकमध्ये एकाचवेळी अनेक विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.

स्टूडेंट सॅटॅलाइट वेहिकल मिशन 2023 या मिशनसाठी संपूर्ण देशातून विविध राज्यातून एकूण 5000 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या मिशन मध्ये प्रिन्स इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेजचे विझन मारोती खाडे व पूर्वेश अनुप गुप्ता (वर्ग 8 वी) या विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेला पिको सॅटॅलाइट व सर्व राज्यातून सहभागी विद्यार्थ्यांनी एकूण 150 पिको सॅटॅलाइट तयार करून भारतातील प्रथम हायब्रीड रॉकेट द्वारे रविवारी सकाळी 7.45 वाजता अवकाशात यशस्वीरित्या डॉ आनंद मेगालिंगम ( स्पेस झोन इंडिया चेन्नई ) डॉ.गोकुळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्षेपीत करण्यात आला. या अनोख्या उपक्रमासाठी डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे सलीम शेख, दाऊद शेख, मार्टिन ग्रुपचे चार्ल्स जोसेफ व स्पेस झोन इंडियाचे सहकार्य लाभले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीयस्तरावर घेतलेल्या APJKSSLV २०२३ परीक्षेत सुद्धा यश मिळवले. एकूण पाच हजार विद्यार्थ्या पैकी 40 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये शाळेचा विजय मारुती खाडे याने प्रावीण्य मिळवले. पूर्वेश अनुप गुप्ता  या विद्यार्थ्यांनेही पहिल्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा मान मिळवला.या विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान शिक्षक नारायण चौरे यांनी मार्गदर्शन केले. या मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांनी वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड, AKIF शिष्यवृत्ती असे विविध पुरस्कार मिळवले. फेब्रुवारी २०२१ मागील वर्षी ही शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विश्वविक्रम प्रस्थापीत केला होता. दरवर्षी सॅटेलाईट व रॉकेट मेकिंग मिशन मध्ये प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून आला. या शाळेचे कौतुक देशपातळीवरही होत आहे. शाळेत घेण्यात येत असणारी प्रेसिडेनशिअल टेस्ट, डॉ.संजय रोडगे यांच्या संकल्पनेतली डिकूनार ग्रुप ॲक्टिव्हिटी, सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, सर्व प्रकारच्या प्रात्यक्षिक लॅब व अत्याधुनिक अटल टिंकरिंग लॅब आम्हा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे  हे यश मिळवू शकलो असल्याचे विजय खाडे व पूर्वश गुप्ता या विद्यार्थ्यांनी सांगितले. या यशासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ सविता रोडगे, डॉ. रामराव रोडगे,डॉ आदित्य रोडगे, डॉ अपूर्वा रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व  शुभेच्छा दिल्या.

शाळेत घेण्यात येत असणारी प्रेसिडेनशिअल टेस्ट, डॉ.संजय रोडगे यांच्या संकल्पनेतली डिकूनार ग्रुप ॲक्टिव्हिटी, सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, सर्व प्रकारच्या प्रात्यक्षिक लॅब व अत्याधुनिक अटल टिंकरिंग लॅब आम्हा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे  हे यश मिळवू शकलो असल्याचे विजय खाडे व पूर्वश गुप्ता या विद्यार्थ्यांनी सांगितले.

छत्रपती शिवराय : लोकशाहीची बीजे पेरणारा राजा; सेलूतील नूतन शाळेत महाराजांना अभिवादन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!