छत्रपती शिवराय : लोकशाहीची बीजे पेरणारा राजा; सेलूतील नूतन शाळेत महाराजांना अभिवादन
महाराष्ट्र राज्य गीताचे सादरीकरण
सेलू : लोकांसाठी झालेला लोककल्याणकारी राजा, जिवाची पर्वा न करणारा, असा राजा छत्रपती शिवराय म्हणजे लोकशाहीची बीजे पेरणारा राजा होय, असे मत शिक्षक राजेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नूतन विद्यालयात रविवारी (१९ फेब्रुवारी) रोजी सकाळी साडेदहा वाजता शाळेत अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुख्याध्यापक नारायण सोळंके, उपमुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक के.के.देशपांडे, पी.टी.कपाटे, बन्सीलाल पद्मावत, बाबासाहेब हेलसकर, सुनीता सांगुळे, विशाल क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
या वेळी संतोष पाटील यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांनी महाराष्ट्र राज्य गीत सादर केले. सूत्रसंचालन अतुल पाटील यांनी केले. कार्यक्रमाला प्रशांत नाईक, एस.एस.पांडे, संतोष क्षीरसागर, सुनील तोडकर, आरती कदम, फुलसिंग गावीत, कुशल कडे, गजानन मुळी, गोरखनाथ घायाळ आदींची उपस्थिती होती.