सेलूच्या विकासाला गती देणार : आमदार मेघना बोर्डीकर, तीस कोटींच्या रस्ते कामाचे भूमिपूजन

सेलूच्या विकासाला गती देणार : आमदार मेघना बोर्डीकर, तीस कोटींच्या रस्ते कामाचे भूमिपूजन

प्रलंबित १३२ केव्ही विद्युत केंद्रालाही नव्याने मंजुरी,  सेलू शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग कामाला गती मिळणार

तीस कोटींच्या रस्ते कामांचे सेलूत भूमिपूजन

बाबासाहेब हेलसकर…

सेलू जि.परभणी : शहरासह तालुक्यातील प्रलंबीत रस्त्याच्या विकास कामांना गती देऊन विकासाचा अनुशेष लवकरच भरून काढणार असल्याची ग्वाही आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सोमवारी (२७ मार्च) दिली.
वालूरनाका परिसरात आयोजित रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी बोर्डीकर बोलत होत्या. व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार, मुख्याधिकारी देविदास जाधव, उद्योजक जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, आर. बी.घोडके, श्रीवल्लभ लोया, ॲड. अशोक फोपसे, चंद्रशेखर नावाडे, विष्णू शेरे, अरूण पांडे, दत्तूसिंग ठाकुर, हाजी अजीज अली खान मौलाना तजमुल अहेमद खाँ, उपअभियंता एल. एच.नामावार आदी मान्यवर उपस्थित होते.
सेलू नगरपालिका हद्दीतील राज्य महामार्ग क्रमांक २५३ पासून ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत (जुन्या सेलू-वालूर) ३.५ किमी लांबीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन या वेळी झाले. हा रस्ता दुभाजकासह चार पदरी सिमेंट क्राँकिट रस्ता असून, नाल्या, पथदिवे, वृक्षारोपणसह ३० कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर झाला असल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. देवगाव-सेलू-पाथरी १२ किमी, देवगाव -चारठाणा-शिरडशहापुर या रस्त्याला देखील मंजुरी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रलंबित १३२ केव्ही विद्युत केंद्रालादेखील नव्याने मंजुरी मिळाली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत, साई नाट्यगृहाचे अद्ययावतीकरण, डी पी रस्ते आदी विकास कामे तात्काळ सुरू करण्यात येणार असल्याचे बोर्डीकर यांनी सांगितले. नगरपालिकेला विकास कामांसाठी १० कोटी रुपयांचा वाढीव निधीही लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती दिली. प्रास्ताविक उपअभियंता बळीराम माने यांनी केले, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर अर्जुन बोरूळ यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी कपील फुलारी, भागवत दळवे, जयसिंग शेळके, रामेश्वर काजळे, दगडोबा जोगदंड, ॲड. दत्तात्रय कदम, शेख शफीक, शेख सीराज, युनुस कुरेशी, विठ्ठल कोक्कर, शिवहरी शेवाळे, महादेव गायके, संदीप बोकन, गणेश सवणे, गोविंद शर्मा, वनिता चाफेकर, रूपाली ठाकूर आदींनी परीश्रम घेतले.

देवगाव-सेलू-पाथरी १२ किमी, देवगाव-चारठाणा-शिरडशहापुर या रस्त्याला देखील मंजुरी प्राप्त झाली आहे. प्रलंबित १३२ केव्ही विद्युत केंद्रालादेखील नव्याने मंजुरी मिळाली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत, साई नाट्यगृहाचे अद्ययावतीकरण, डी पी रस्ते आदी विकास कामे तात्काळ सुरू करण्यात येणार आहेत. नगरपालिकेला विकास कामांसाठी १० कोटी रुपयांचा वाढीव निधीही लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी दिली.

तीस कोटींच्या रस्ते कामांचे सेलूत भूमिपूजन

दारूलउलुम मदरसा ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (जुना सेलू -वालूर रोड) हा चारपदरी सिमेंट रस्ता तयार झाल्यावर, सेलू शहराच्या वाहतुकीवरील अतिरीक्त ताण कमी होणार आहे, नागरिकांचा त्रास कमी होऊन व्यापार व विकासाला चालना मिळेल, असे मत उद्योजक जयप्रकाश बिहाणी यांनी या वेळी व्यक्त केले

तीस कोटींच्या रस्ते कामांचे सेलूत भूमिपूजन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!