राज्य शालेय बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धांचे आज उद्घाटन; तीनशेवर खेळाडू दाखल 

राज्य गड बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धांचे आज उद्घाटन; तीनशेवर खेळाडू दाखल 

१४ व १७ वर्षाखालील मुला-मुलींचा सहभाग, मान्यवरांची राहणार उपस्थिती 

परभणी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व परभणी जिल्हा बॉलबॅडमिंटन असोसिएशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मंगळवारी (२८ मार्च) सकाळी दहा होत आहे. 

१४ व १७ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात २८ व २९ मार्च रोजी या स्पर्धा होतं आहेत. स्पर्धेत राज्य भरातून ३२ मुले व मुली संघातील ३४० खेळाडू परभणी दाखल झाले आहेत. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आंचल गोयल आहेत. उद्घाटक म्हणून खासदार संजय जाधव, तर विशेष अतिथी म्हणून राज्यसभा सदस्य खासदार फौजिया, आमदार सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे, विधान परिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विप्लव बाजोरिया, परभणीचे

आमदार डॉ.राहुल पाटील, पाथरीचे आमदार सुरेशराव वरपुडकर, जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हा पोलिस अधीक्षक रागसुधा आर. मुख्यकार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.पी.के. पटेल, परभणी जिल्हाध्यक्ष उत्तमराव हत्तीअंबीरे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त यु.डी.इंगळे, मंगल पांडे, डॉ.माधव शेजुळ आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, तालुका क्रीडा अधिकारी शैलेंद्र सिंग गौतम, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, महेश खर्डेकर, प्रकाश होनवडजकर आदींनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!