सुंदर माझी गुढी : स्पर्धेला सेलूत उत्स्फूर्त प्रतिसाद, साई कीर्तन महोत्सवास आजपासून प्रारंभ

सुंदर माझी गुढी : स्पर्धेला सेलूत उत्स्फूर्त प्रतिसाद, साई कीर्तन महोत्सवास आजपासून प्रारंभ

श्रीराम जन्मोत्सव : साईबाबा मंदिरात श्रीमद् भागवत कथा, विविध सामाजिक कार्यक्रम

सेलू : गुढीपाडवा व श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सेलू (जि.परभणी) येथील साईबाबा मंदिरात गुरुवारपासून (२३ मार्च) श्रीमद् भागवत कथा, तसेच कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने आयोजित हा महोत्सव गुरुवारपर्यंत (३० मार्च) चालणार आहे यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. २३ मार्चपासून नंदकिशोर पुराणिक गोंदीकर महाराज यांची दुपारी एक ते पाच या वेळेत संगीतमय श्रीमद् भागवत कथा आहे. दररोज रात्री आठ वाजता ज्ञानेश्वर महाराज तांबे, पल्लवी महाराज दौड, माऊली महाराज खडकवाडीकर, कीर्तन केसरी संतोष महाराज वनवे, प्रकाश महाराज साठे, जयश्री तिकांडे आदींचे कीर्तन आहे. २५ मार्चला मुक्ता व शिवानी‌ चाळक यांचा रंगीत संगीत हरिपाठ, २६ मार्च रात्री श्री कृष्ण जन्मोत्सवानिमित्त बेल वृक्षाच्या रोपट्यांचे वाटप होईल.३० मार्च रोजी शिवाजी महाराज खवणे यांचे काल्याचे कीर्तन, श्रीराम जन्मोत्सव सोहळा, महाआरती व महाप्रसाद (नगरभोजन) होईल. महोत्सवातील विविध कार्यक्रमांला उपस्थित राहावे, असे आवाहन साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

‘बेटी बचाव’ चा नारा

गुढी पाडव्यानिमित्त सेलू (जि.परभणी) येतील श्री साईबाबा मंदिरात बुधवारी (२२ मार्च) आयोजित ‘सुंदर माझी गुढी’ स्पर्धेला बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी हिरीरीने सहभाग घेत, कल्पकतेने गुढ्या उभारल्या होत्या. गुढ्यासमोरील आकर्षक सजावटीने लक्ष वेधले. ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’ जलसाक्षरता आदी संदेश या माध्यमातून देण्यात आला. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली साईराज बोराडे, राजेंद्र पवार, शंकर राऊत, प्रशांत माणकेश्वर, गिरीश लोडाया, गंगाधर कान्हेकर, रवि मुळावेकर, मिलिंद सावंत आदींसह विनोद बोराडे मित्रमंडळ व श्री साईबाबा भक्तांनी संयोजनात सहभाग घेतला.

श्री कालिकादेवी यात्रा महोत्सवाला आजपासून प्रारंभ; हेलस येथे विविध कार्यक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!