श्री कालिकादेवी यात्रा महोत्सवाला आजपासून प्रारंभ; हेलस येथे विविध कार्यक्रम
हेलस : शनिवारपर्यंत चालणार महोत्सव, कीर्तन प्रवचनासह भरगच्च सामाजिक कार्यक्रम
परभणी/जालना : हेलस (ता.मंठा) येथील श्री कालिकादेवीच्या ४० व्या वार्षिक यात्रा महोत्सवाला गुरुवारपासून (२३ मार्च) सुरुवात होत आहे. या निमित्ताने तीन दिवस पारंपरिक धार्मिक उत्सव; तसेच कीर्तन, प्रवचन, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.
मंदिर संस्थानचे अध्यक्ष सतीश तळणीकर यांनी ही माहिती दिली. या वेळी उपाध्यक्ष सुभाष दहिभाते, सचिव बाबासाहेब हेलसकर, बालासाहेब दहिभाते, बबनराव हेलसकर, गोपाळराव दहिभाते, माधवराव वानरे, गोपाळ नामदेव, गजानन कुंभकर्ण, वर्धमान कासार, अशोक हेलसकर यांची उपस्थिती होती.
हेलस येथील श्री कालिकादेवीचे मंदिर बाराव्या-तेराव्या शतकातील असून, प्राचीन हेमाडपंती बांधकामात आहे. कासार समाजाच्यावतीने पारंपरिक उत्सवाची शेकडो वर्षाची परंपरा आहे. १९६७ मध्ये संस्थानची नोंदणी झालेली आहे. १९८४ पासून सार्वजनिक उत्सवाला सुरुवात झाली.
विविध कार्यक्रम
या वर्षी उत्सवानिमित्त दररोज सकाळी साडे सात ते साडे नऊ या वेळेत अशोककुमार वानरे, मीनाक्षी सतीश कंधारकर, अनंतकुमार विश्वंभर, जया सनतकुमार वानरे यांच्या नेतृत्वात देवीला पारंपरिक चढाव, अभिषेक, महापूजा, महाआरती होईल. दुपारी चार वाजता आराधना यजमानांतर्फे महाप्रसाद आहे. सायंकाळी सात वाजता देवीचा छबिना उत्सव व आरती होईल. गुरुवारी (२३ मार्च) दुपारी बारा वाजता भागवताचार्य माणिक महाराज मांगुळकर (दहेगाव ता.जिंतूर) यांचे कीर्तन, शुक्रवारी (२४ मार्च) दुपारी देविदास महाराज ढोके यांचे ज्ञानेश्वरी प्रवचन, तर सायंकाळी श्री जगदंबा मंदिर रवळगाव यांच्यावतीने हरिपाठ होणार आहे. रात्री नऊ वाजता रामायणाचार्य रामेश्वर महाराज नालेगावकर (मंठा) यांचे कीर्तन आहे.
यात्रेच्यानिमित्त गावकऱ्यांसह मराठवाडा, विदर्भ व राज्यातील समाज बांधवांच्यावतीने महाप्रसाद, अल्पोपहार, चहापान, शुद्ध पिण्याचे पाणी आदी सेवा देण्यात आलेली आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी छगनराव हेलसकर, शंकरराव हेलसकर, रमेश हेलसकर, वर्धमान कासार, नारायण कुंभकर्ण, गजानन कुंभकर्ण, भरत दहिभाते, गजानन हेलसकर, पंढरीनाथ हेलसकर, ज्ञानेश्वर हेलसकर, विजय दहिभाते, सूरज दहिभाते, गजानन ढोले, प्रमोद दहिभाते, कालिदास दहिभाते, कृष्णा दहिभाते, संदीप दहिभाते, संतोष दहिभाते आदींसह महिला मंडळ, नवयुवक मंडळ, कासार समाज बांधव व ग्रामस्थ परिश्रम घेत आहे. यात्रा महोत्सवातील विविध कार्यक्रमांचा, तसेच महाप्रसाद लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच पुढील वर्षीच्या (२०२४) वार्षिक यात्रोत्सवासाठी आराधना, अल्पोहार, चहापान, जलसेवेच्या सहभागासाठी यात्रा काळात नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.
आराधना सेवा सन्मान
श्री कालिकादेवी यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने मराठवाड्यासह राज्यातील विविध ठिकाणच्या वीसहून अधिक कासार समाज बांधवांना सपत्नीक आराधना सेवा सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. या मध्ये शंकरराव बाबूराव हेलसकर, गोपाळ दहिभाते, रामप्रसाद वऱ्हाडे, सुभाषराव कुंभकर्ण, वसंतराव विश्वांभरे, भास्करराव शिलवंत, अशोक हलगे, आबासाहेब पानपट, किरणचंद विभुते, सुभाष रांजणकर, प्रकाश चिलवंत, गणेश आहेर, सुभाषराव शिलवंत, विशाल अक्कर, प्रकाश विभुते, स्वप्नील वानरे, रामकृष्ण खोमाडे, गजानन खराबे, प्रा.सूर्यकांत शेंडे, दत्तराव खराबे यांचा समावेश आहे, अशी माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
सेलूतील ‘सुंदर माझी गुढी’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, साई कीर्तन महोत्सवास आजपासून प्रारंभ