ब्रह्माकुमारी केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात; जवळा बाजारमध्ये विविध कार्यक्रम

ब्रह्माकुमारी केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात; जवळा बाजारमध्ये विविध कार्यक्रम

विविध कार्यक्रमांचे आय़ोजन, मान्यवरांची उपस्थिती

जवळा बाजार : जवळा बाजार येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा १९ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी उद्योजक सतीश सोमाणी, युनिक इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष प्रल्हाद कदम, उपसरपंच गणेशराव गाढवे, प्रमुख मार्गदर्शक ब्रह्माकुमारी महानंदा दिदी ( उदगीर), ब्रह्माकुमारी अर्चना दिदी (परभणी) यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

ब्रह्माकुमारी केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात; जवळा बाजारमध्ये विविध कार्यक्रम

या बोलतांना महानंदा दिदी‌ म्हणाल्या, ” जीवनाचे निर्वाहन करत असताना प्रत्येकाने कर्माचे भान ठेवून कार्य करावे. संत, महंत, मुनी यांचे दुष्ट लोकांनी देखील स्वागत केले आहे. रावणाच्या दरबारात नारदमुनींचे नेहमी आदरतिथ्य केले जायचे. देवाला न मानणाऱ्या हिरण्यकश्यपने देखील संताचे आदरतिथ्य केले आहे.” अर्चना दिदी यांनी ओम शांती सेंटरमध्ये मुरली ऐकण्यासाठी साधकांनी नियमित यावे, असे आवाहन केले. ब्रह्माकुमारी सविता दिदी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ब्रह्माकुमारी ज्योती दिदी यांनी केले. सूत्रसंचालन नंदू बाहेती यांनी केले यांनी केले. ब्रह्माकुमारी माधुरी दिदी यांनी आभार मानले.‌ या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकम यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी माधुरी दिदी, राधिका दिदी, ब्रह्माकुमारी परिवार व साधकांनी पुढाकार घेतला.

ब्रह्माकुमारी केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात; जवळा बाजारमध्ये विविध कार्यक्रम

जीवनाचे निर्वाहन करत असताना प्रत्येकाने कर्माचे भान ठेवून कार्य करावे. संत, महंत, मुनी यांचे दुष्ट लोकांनी देखील स्वागत केले आहे. रावणाच्या दरबारात नारदमुनींचे नेहमी आदरतिथ्य केले जायचे. देवाला न मानणाऱ्या हिरण्यकश्यपने देखील संताचे आदरतिथ्य केले आहे.

– ब्रह्माकुमारी महानंदा दिदी, उदगीर

हेही वाचा : 

आठशे दिव्यागांना दीड कोटींचे साहित्य वाटप; आमदार मेघना बोर्डीकर यांचा पुढाकार

सन्मान : हेलसच्या सानेगुरुजी कथामालेचा ‘समाज प्रबोधिनी’ पुरस्काराने गौरव, अहमदपूर येथे वितरण

थेट बांधावर : गारपीटग्रस्त भागात खासदार जाधव, जिल्हाधिकारी गोयल यांची पाहणी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!