सन्मान : हेलसच्या सानेगुरुजी कथामालेचा ‘समाज प्रबोधिनी’ पुरस्काराने गौरव, अहमदपूर येथे वितरण
अहमदपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम, सामाजिक योगदानाबद्दल हेलस कथामालेचा सन्मान
सेलू : अहमदपूर (जि.लातूर) येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हेलस (ता.मंठा) येथील अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला शाखेला २०२३ या वर्षाच्या ‘समाज प्रबोधनी’ पुरस्काराने रविवारी (१९ मार्च) गौरविण्यात आले.
अहमदपूर येथील पंचायत समिती सभागृहात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी बाळासाहेब जाधव होते. या वेळी ॲड.रमेश राठोड, प्रा. गोविंद शेळके, मंजुषा निंबाळकर, संगीता खंडागळे, संयोजक मेघराज गायकवाड, प्रा.राम तत्तापूरे, प्रा.रत्नाकर नळेगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षा कल्पना दत्तात्रय हेलसकर यांनी पुरस्कार स्वीकारला. अनिता शिंदे, सतीश कुलकर्णी, विलास शिंदे, आशा रोडगे आदींची यावेळी उपस्थिती होती. स्व.दत्तात्रय हेलसकर यांनी स्थापन केलेल्या हेलसच्या कथामाला शाखेच्या वतीने गेल्या तीस वर्षांपासून विद्यार्थी विकासाचे ; तसेच सामाजिक, विधायक व सांस्कृतिक उपक्रम हिरीरीने राबविले जातात. याची दखल घेत सामाजिक योगदानाबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराबद्दल सानेगुरुजी कथामालेचे जालना जिल्हाध्यक्ष डॉ.सुहास सदाव्रते, कार्यवाह आर.आर.जोशी, बाबासाहेब हेलसकर, डॉ.व्यंकटेश चौधरी, प्रमोद देशमुख, विजय वायाळ, मंताजी ढाकरे, कीर्ती राऊत, जमीर शेख,अख्तरजहॉं कुरेशी, संतोष लिंगायत आदींनी अभिनंदन केले आहे.
स्व.दत्तात्रय हेलसकर यांनी स्थापन केलेल्या हेलसच्या कथामाला शाखेच्या वतीने गेल्या तीस वर्षांपासून विद्यार्थी विकासाचे ; तसेच सामाजिक, विधायक व सांस्कृतिक उपक्रम हिरीरीने राबविले जातात. याची दखल घेत सामाजिक योगदानाबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षा कल्पना दत्तात्रय हेलसकर यांनी पुरस्कार स्वीकारला. अनिता शिंदे, सतीश कुलकर्णी, विलास शिंदे, आशा रोडगे आदींची यावेळी उपस्थिती होती.
आठशे दिव्यागांना दीड कोटींचे साहित्य वाटप; आमदार मेघना बोर्डीकर यांचा पुढाकार
थेट बांधावर : गारपीटग्रस्त शिवारात माजी आमदार विजय भांबळेंकडून पाहणी: तात्काळ मदतीची ग्वाही
थेट बांधावर : गारपीटग्रस्त भागात खासदार जाधव, जिल्हाधिकारी गोयल यांची पाहणी
विज्ञान दिन : विविध स्पर्धांचे सेलूत बक्षीस वितरण; श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम