आठशे दिव्यागांना दीड कोटींचे साहित्य वाटप; आमदार मेघना बोर्डीकर यांचा पुढाकार
जिंतूर येथील दिव्यांग शिबिराला मोठा प्रतिसाद, दिव्यांगपयोगी १२५० साहित्याचे वाटप
सेलू जि.परभणी : जिंतूर येथे आयोजित दिव्यांग शिबिरात आमदार मेघना बोर्डीकर यांच्याकडून ८०० दिव्यांगांना तब्बल दीड कोटी रुपयांचे साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये कृत्रिम हात, पाय, कुबड्या, व्हील चेअर, इलेक्ट्रिक सायकल आदी साहित्याचा समावेश आहे.
पोद्दार लर्न स्कूलच्या परिसरात रविवारी (१९ मार्च) शिबिर आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आमदार मेघना बोर्डीकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांची उपस्थिती होती. या वेळी आमदार बोर्डीकर म्हणाल्या की, २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगांसाठी “दिव्यांग” हा सन्मानपूर्वक शब्द वापरला. यावरून दिव्यांगांबद्दल त्यांना किती प्रेम आहे, हे लक्षात येते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात प्रथमच दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापित केले. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे दिव्यांगांसाठी कल्याण मंत्रालय उभारले आहे. दिव्यांगांपासून मला देखील जगण्याची नवी ऊर्जा, प्रेरणा मिळते. बऱ्याच जणांनी दिव्यांगावर मात करून यशश्री खेचून आणली आहे. दिव्यांगांप्रती माझ्या मनात अपार प्रेम आहे. जिंतूर,सेलू मतदारसंघातील माझ्या बांधवांनी मला भरभरून दिले. त्यांच्या सेवेत मी कुठेच कमी पडणार नाही. मतदार संघातील सुशिक्षित तरुणांसाठी सुद्धा रोजगार मिळावा घेऊन चारशे तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. दिव्यांगांसाठीही मला अजून खूप काही करायचे आहे. काही दिव्यांग बांधव येऊ शकले नाही. त्यांच्यासाठी या वस्तू घरपोच पाठविल्या जातील.तसेच या लाभापासून काही बांधव वंचित राहिले असतील त्यांच्यासाठीही पुन्हा शिबिर आयोजित केले जाणार असल्याचे बोर्डीकर यांनी या वेळी सांगितले.
दिव्यांगांपासून मला देखील जगण्याची नवी ऊर्जा, प्रेरणा मिळते. बऱ्याच जणांनी दिव्यांगावर मात करून यशश्री खेचून आणली आहे. दिव्यांगांप्रती माझ्या मनात अपार प्रेम आहे. जिंतूर,सेलू मतदारसंघातील माझ्या बांधवांनी मला भरभरून दिले. त्यांच्या सेवेत मी कुठेच कमी पडणार नाही. काही दिव्यांग बांधव येऊ शकले नाही. त्यांच्यासाठी या वस्तू घरपोच पाठविल्या जातील. तसेच; या लाभापासून काही बांधव वंचित राहिले असतील त्यांच्यासाठी पुन्हा शिबिर आयोजित केले जाणार असल्याचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी या वेळी सांगितले.
सन्मान : हेलसच्या सानेगुरुजी कथामालेचा ‘समाज प्रबोधिनी’ पुरस्काराने गौरव, अहमदपूर येथे वितरण
थेट बांधावर : गारपीटग्रस्त शिवारात माजी आमदार विजय भांबळेंकडून पाहणी: तात्काळ मदतीची ग्वाही
थेट बांधावर : गारपीटग्रस्त भागात खासदार जाधव, जिल्हाधिकारी गोयल यांची पाहणी
विज्ञान दिन : विविध स्पर्धांचे सेलूत बक्षीस वितरण; श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम