थेट बांधावर : गारपीटग्रस्त शिवारात माजी आमदार विजय भांबळेंकडून पाहणी: तात्काळ मदतीची ग्वाही
शेतकऱ्यांचा व्यथा घेतल्या जाणून, भरघोस मदत मिळवून देण्याची ग्वाही
परभणी : जिंतूर तालुक्यात गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात प्रचंड गारपीट होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. रविवारी (१९ मार्च) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार विजयराव भांबळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गारपीटग्रस्त शेतशिवाराची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या यांच्या माध्यमातून तात्काळ भरघोस मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भांबळे यांनी शेतकऱ्यांना दिली.
जिंतूर तालुक्यातील आसेगाव परिसरातील शेतात माजी आमदार भांबळे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांनी अतोनात मेहनत करून हाती आलेले सोन्यासारखे पिक गारपीट झाल्याने हातचे गेले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. ज्वारी, बाजरी, गहू, कांदा, लसून, भोईमुग, कापूस तसेच फळबाग पपई, संत्री, मोसंबी, अंगूर, केळी ही सर्व पिके अक्षरशः गारपीटीमुळे खराब झाली आहेत. तालुक्यातील गारपीट झालेली परिस्थिती आणि शेतकऱ्यांची व्यथा पाहून शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भांबळे यांनी शेतकऱ्यांना दिली. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज, जिल्हा परिषदचे माजीससभापती रामराव उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिनय राऊत, पंचायत समितीचे माजी सभापती गणेशराव, सचिन राऊत, पांडुरंग पवार, हरिभाऊ गायकवाड ,विश्वंबर पवार, रंगराव पवार ,दत्तराव घोळवे, हनुमान पवार, दत्तराव काटकर, जगनाथ पवार, विठ्ठल पवार, अशोक पवार, दिगांबर कुटे, सुधीर देशमुख, विठ्ठल मुटकुळे, श्याम सारंग, रोशन भाई, अप्पाराव साखरे, पप्पू साखरे, सुहास पवार, अक्षय पवार, प्रकाश जव्हार, बंडू राखुंडे, अशोक फिसफिसे, पंढरी पवार, राम पवार, ज्ञानदेव पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.
गारपीटीने ज्वारी, बाजरी, गहू, कांदा, लसून, भोईमुग, कापूस तसेच फळबाग पपई, संत्री, मोसंबी, अंगूर, केळी ही सर्व पिके अक्षरशः खराब झाली आहेत. तालुक्यातील गारपीट झालेली परिस्थिती आणि शेतकऱ्यांची व्यथा जाणून, शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या माध्यमातून तात्काळ भरघोस मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी आमदार विजय भांबळे यांनी शेतकऱ्यांना दिली. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज, जिल्हा परिषदचे माजीससभापती रामराव उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिनय राऊत आदींसह शेतकरी उपस्थित होते.
आठशे दिव्यागांना दीड कोटींचे साहित्य वाटप; आमदार मेघना बोर्डीकर यांचा पुढाकार
सन्मान : हेलसच्या सानेगुरुजी कथामालेचा ‘समाज प्रबोधिनी’ पुरस्काराने गौरव, अहमदपूर येथे वितरण
थेट बांधावर : गारपीटग्रस्त भागात खासदार जाधव, जिल्हाधिकारी गोयल यांची पाहणी
विज्ञान दिन : विविध स्पर्धांचे सेलूत बक्षीस वितरण; श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम