विज्ञान दिन : विविध स्पर्धांचे सेलूत बक्षीस वितरण; श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम
प्रॉस्परस पब्लिक स्कूलचा पुढाकार, ८० स्पर्धकांचा सहभाग
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचालित प्रॉस्परस पब्लिक स्कूलच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण शनिवारी (१८ मार्च) झाले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे होते. या वेळी म्हणून प्रमुख पाहुणे नितीन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, अशोक आंबेकर, शरद शेळके, प्रभाकर गिराम, राहुल मोरे आदींची उपस्थिती होती.
विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सायन्स मॉडेल, सायन्स रांगोळी, पोस्टर आदी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत रोटी मेकर, मानवी आंर्तइंद्रियाचा सांगाडा, वॉटर अलार्म, सौरऊर्जा आदी उपकरणांनी प्रथम क्रमांक, तर हैड्रोलीक कार लिफ्ट, वर्किंग मॉडेल ऑफ ह्यूमन हर्टला द्वितीय क्रमांक मिळाला. ह्यूमन किडनी स्ट्रक्चर, कोरोना योद्द्यांचे कार्य दर्शवणार्या रांगोळीने पारितोषिक पटकाविले. या वेळी डॉ.रोडगे यांनी मार्गदर्शन केले. आगामी शैक्षणिक वर्षापासून केजीच्या विद्यार्थ्यांसाठी सेलू शहरात फिनलॅंड शिक्षण पद्धतीवर आधारित ‘फिनकीड्स’ मार्फत सुविधा उपलब्ध होणार आहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी सांगितले. सूत्रसंचालन ताठे यांनी केले.नवले यांनी आभार मानले