पसायदान : गुरुवारपासून सेलूत चैतन्य महाराज देगलूरकरांचे प्रवचन
स्व.वसंतराव खारकरमामा यांचे स्मरण, वसंत प्रतिष्ठानचा उपक्रम :
सेलू जि.परभणी : येथील वसंत प्रतिष्ठान व खारकर परिवाराच्या वतीने गुरुवारपासून ( ६ एप्रिल) तीन दिवस चैतन्य महाराज देगलूरकर यांची ‘पसायदान’ प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे. प्रवचनमालेचे हे चौथे वर्ष आहे. साईबाबा मंदिरातील सभामंडपात शनिवारपर्यंत ( ८ एप्रिल ) दररोज सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत ही प्रवचनमाला होणार आहे. श्रोत्यांनी, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.