सभापतिपदासाठी डॉ.संजय रोडगेंची उमेदवारी घोषित; सेलू बाजार समिती निवडणूक
भाजपाचे नेते गंगाधर बोर्डीकर यांची घोषणा, सेलू तालुक्यातील आगामी निवडणुका डॉ.रोडगेंना विचारात घेऊनच
सेलू : कृषि उत्पन्न बाजार समिती होणाऱ्या निवडणुकीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीकरिता हजारोंच्या संख्येने डॉ.संजय रोडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोर्डीकर यांनी सेलू तालुक्यातील आगामी सर्व निवडणुका डॉ.रोडगे यांना विचार घेऊनच लढविल्या जातील, तसेच बाजार समितीच्या सभापतीपदाचे उमेदवार म्हणून डॉ.रोडगे असतील, असे घोषित केले. या वेळी माजी सभापती रवी डासाळकर, दिनकर वाघ, ॲड.दत्ता कदम, भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जोगदंड, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवहरी शेवाळे, जिल्हा कोषाध्यक्ष महादेव गायके, भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश अण्णा नाईकवाडे, डॉ. ऋतुराज साडेगावकर, विठ्ठलराव ताठे, सरपंच किशोर कारके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गंगाधरजी बोर्डीकर म्हणाले, ”डॉ.संजय रोडगे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवत, तसेच त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय उत्कृष्ट कार्याचा विचार करता, होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचे उमेदवार म्हणून घोषित करतो. आगामी काळातील तालुक्यातील सर्व निवडणुका डॉ.संजय रोडगे यांना विचारात घेऊन लढवल्या जातील. डॉ.संजय रोडगे हे एक राजकीय कुशल संघटक व उच्चशिक्षित असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला नक्की चांगले दिवस येतील. सर्व सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांना पॅनल टू पॅनल मतदान करण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.
डॉ.रोडगे म्हणाले की, गंगाधरजी बोर्डीकर यांनी सांगितल्या प्रमाणे कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी नक्कीच शेतकरी हितार्थ निर्णय घेऊन सर्वांगीण विकास कसा साधता येईल, तसेच येत्या काळामध्ये सेलू बाजार समिती एक आदर्श बाजार समिति म्हणून कशी ओळख निर्माण करता येईल, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, गंगाधर बोर्डीकर यांच्या सहकार्याने कार्य केले जाईल.
निवडणूक निर्वाचन अधिकारी प्रशांत थारकर यांच्याकडे डॉ. रोडगे यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. रंगनाथ भाबट, कंस मानमोडे, अशोकराव निर्वळ, भागवत दळवे, भाजप शहराध्यक्ष कपिल फुलारी, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस संदीप बोकन, जीवन ढवळे, रावसाहेब बुरेवार, दत्तराव पौळ, ॲड.रामेश्वर शेवाळे, मयूर वाघ, पत्रकार अशोक अंभोरे, गोविंद शिंदे नांदगावकर, मारुतराव मगर, गोविंद महार, गुलाबराव रोडगे, ज्ञानेश्वर चौरे, परमेश्वर चौरे, विठ्ठल पानजंजाळ, जयसिंग शेळके, डॉ.संजय लोंढे, डॉ. आशिष डंख, संजय लोया,भुजंग ताठे, रावसाहेब बुरेवार, रामेश्वर गटकळ, जलाल भाई, अशोक सेलवाडीकर निलेश सोळंके, गणेश सोळंके, राजू सोळंके, दगडोबा जोगदंड, संदीप बोकन, गोविंद शर्मा, गोविंद मगर, गोविंद भदर्गे, दत्तराव लाटे कैलास रोडगे, राजेश काळे, गंगाधरराव रोडगे, पंजाबराव पॏळ, अनिल पॏळ, शिवाजी आप्पा रोडगे, प्रकाश गजमल, दीपक रोडगे, गणेश रोडगे आदीसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.