सेलू बाजार समितीसाठी इच्छुकांची झुंबड; 122 जणांचे अर्ज

सेलू बाजार समितीसाठी इच्छुकांची झुंबड; 122 जणांचे अर्ज

महाविकास आघाडीची एकी; भाजपाचे डॉ.रोडगे यांचीही उमेदवारी, प्रमुख नेत्यांची उपस्थिती

सेलू : कृषी बाजार समितीच्या निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत सोमवारपर्यंत (तीन एप्रिल ) एकूण 122 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सहकारी संस्था मतदार संघ 77, ग्रामपंचायत 30, व्यापारी 09, हमाल मापाडी मतदार संघात 06 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी मोठ्या संख्येने सोमवारी तीन एप्रिल रोज उमेदवारी अर्ज दाखल आले. या वेळी महाविकास आघाडीचे नेते  हेमंतराव आडळकर, संजय साडेगावकर,  अशोकराव काकडे,  राजेंद्र  लहाने,  विनायकराव पावडे,  रणजित गजमल, पुरुषोत्तम पावडे,  रमेशराव डख,  अप्पासाहेब डख,  माऊली ताठे,  सुधाकर रोकडे,  विठल महाराज कारके, दत्तराव आंधळे, प्रकाश देशमुख, अजय डासाळकर,  इस्माईल सेठ,  सुनील जोगदंड,  राघूनाथ टाके, प्रभाकर सोळंके,  केशव सोळंके, प्रदीप कदम, चंद्रकांत गाडेकर, पवन मोरे, शिवराम कदम, महादेव कवठे, अंकुश लोंढे, अरुण ताठे, दिलीप आकात, मुंजाभाऊ काष्ठे, डॉ.अप्पासाहेब लहाने, अमोल काकडे, उद्धव गजमल, शिवाजी गिणगीने, बबन तिडके, विष्णू मगर, बाबा भदरगे, अशोक पवार, गणेश मुंडे, दिलीप आकात, राजेश राऊत, अपासाहेब रोडगे, अनिल डंबाळे, हरिभाऊ रोडगे, तुकाराम रोडगे, श्रीनिवास सोळंके, अशोक खरात, मदन पवार, भगवान पवार, बापूराव अंबुरे, राजकिशोर जैस्वाल, बापूराव डख, नाना बोबडे आदींसह महाविकस आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, भारतीय जनता पक्षात नव्यानेच दाखल झालेले डॉ.संजय रोडगे यांनीदेखील सोमवारी अर्ज दाखल केला. या वेळी भाजपाचे नेते गंगाधर बोर्डीकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेलू बाजार समितीसाठी इच्छुकांची झुंबुड; 122 जणांचे अर्ज

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!