सेलूतील अत्रेनगर पत्रकार गृहनिर्माण संस्था ‘परिवर्तन’च्या ताब्यात; आठ पैकी सात उमेदवार विजयी
पी.बी.राठोड यांची माहिती : राखीव तीनही जागा रिक्त, आठ जागांसाठी झाले मतदान
सेलू जि.परभणी : येथील अत्रेनगर पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडीसाठी रविवारी, दोन एप्रिल रोजी मतदान झाले. मतमोजणीनंतर लगेच निकाल जाहीर झाला झाला. त्यात परिवर्तन पँनलने सात जागावर विजय मिळवत सत्ता ताब्यात घेतली आहे.
अकरा संचालकांच्या निवडीची प्रक्रिया एक मार्च पासून सुरू झाली होती. अनुसूचित जाती-एक, विमुक्त जाती भटक्या जमाती-एक, ओबीसी- एक या संर्वगातून एकही नामनिर्देशन अर्ज आला नाही. त्यामुळे या जागा रिक्त आहेत. सर्वसाधारण सहा जागेसाठी नऊ, तर महिला राखीव दोन जागेसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दोन एप्रिल रोजी सेलू येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. पात्र ५१ पैकी ३५ मतदारांंनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान संपल्यानंतर मतमोजणी प्रक्रिया लगेच घेण्यात आली. ३५ पैकी ४ मते अवैध ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी पी.बी.राठोड यांंनी निकाल जाहीर केला. त्यांना मतदान केंद्राध्यक्ष एस.बी.कुलकर्णी, मतदान अधिकारी विकास पिंगळे, बंडू धानोरकर, गुलाब आढे यांचे सहकार्य मिळाले.
विजयी उमेदवारांची नावे अशी :
सुनंदा बालासाहेब कुलकर्णी (२६), प्रसाद खारकर (२७), बाबासाहेब चारठाणकर (२५) , ॲड.कैलास जोशी (२५), विमल शशीकांत देशपांडे (२५), शरद देशमुख (२३), सुरेश रोडगे (२३), कुसुम नारायण गात (१९). निकालानंतर परिवर्तनच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.