डॉ.संजय रोडगेंच्या बीजेपी प्रवेश सोहळ्याची तयारी सुरू; सर्वांना उत्सुकता
उपमुख्यमंत्री फडणवीसांची मुंबईत घेतली भेट, लवकरच प्रवेश सोहळा
सेलू,परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिम जिल्हा पक्ष निरीक्षक डॉ.संजय रोडगे सेलू (जि.परभणी) येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर डाॅ.रोडगे यांनी शुक्रवारी (३१ मार्च ) उपमूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.दरम्यान,डॉ.रोडगे समर्थकांनी साहेबांच्या बीजेपी प्रवेश सोहळ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
डॉ.रोडगे यांच्या उपमुख्यमंत्री फडणवीसांची मुंबईत घेतलेल्या भेटीच्या वेळी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, डॉ.विद्या चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून डॉ.रोडगे सक्रीय आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार विजय भांबळे व डॉ.रोडगे यांच्यात खटके उडत होते. डॉ.रोडगे यांच्या निर्णयाने आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, विधानसभा निवडणुकीत सेलू तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत डॉ. संजय रोडगे यांच्या सोबत माजी सभापती रविद्रं डासाळकर, दिनकरराव वाघ, सुंदरराव गाडेकर, ॲड.दत्तराव कदम,बाळासाहेब लिपणे, प्रकाशराव गजमल, संजय गटकळ, सोळंके दाजी, दत्तराव लाटे, चव्हाण कैलासराव रोडगे व डॉ.संजयदादा रोडगे मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहूनही इमानेइतबारे काम करीत आहे, पण गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार विजय भांबळे विनाकारण मानसिक त्रास देण्याचे काम करीत आहेत. वारंवार पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना सांगूनही यात बदल होत नाही. माझी विनाकारण पक्षात घुसमट करण्यात येत आहे. त्यामुळे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या सोबत राहून काम करणार आहे. सेलू येथील कार्यक्रमात लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. :
डाॅ.संजय रोडगे
फोटो : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजय रोडगे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. या वेळी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, डॉ.विद्या चौधरी आदी उपस्थित होते.
पूर्ण…