हुकुमशाही थांबा; अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल : सेलू काँग्रेसचा केंद्र सरकारला इशारा

हुकुमशाही थांबा; अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल : सेलू काँग्रेसचा केंद्र सरकारला इशारा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा सेलूत निषेध

सेलू जि.परभणी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कार्यवाहीमुळे देशातील जनता अस्वस्थ झाली असून, हे प्रकार न थांबल्यास देशातील लोकशाही मानणारा प्रत्येक नागरिक राहुल गांधी होवून रस्त्यावर उतरेल, असा इशारा सेलू तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत आडळकर यांनी दिला.

राहुल यांच्यावरील कारवाईचा सेलू (जि.परभणी) तालुका काँग्रेसच्या वतीने बुधवारी (२९ मार्च) निषेध करण्यात आला. हुकुमशाही पद्धतीने वागणार्‍या केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधी यांना आधी संसदेत बोलू दिले नाही. नंतर ते जे बोलले, ते कामकाजातून वगळण्यात आले. आता तर एका निकालाचा आधार घेवून त्यांचे संसद सदस्यत्वच रद्द करण्यात आले. हा प्रकार म्हणजे विरोधीपक्ष आणि पर्यायाने सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. या कार्यवाहीमुळे देशातील जनता अस्वस्थ झाली असून हे प्रकार न थांबल्यास देशातील लोकशाही मानणारा प्रत्येक नागरिक राहुल गांधी होवून रस्त्यावर उतरेल, असा इशारा या प्रसंगी बोलताना काँग्रेस तालुकाध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी दिला. केंद्र सरकारची  एकाधिकारशाही थांबविण्याची मागणी तहसीलदार दिनेश झांपले यांना मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देवून करण्यात आली.
तालुकाध्यक्ष हेमंतराव आडळकर संभाजी पवार, मुश्ताक रब्बानी, नृसिंह हरणे, अतिक  कुरेशी, बापूराव डख, राजेंद्र गाडेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!