परभणी पोलीस सहकारी पतसंस्थेवर विकास पॅनलचे वर्चस्व, तेरा पैकी आठ उमेदवारांचा दणदणीत विजय

परभणी पोलीस सहकारी पतसंस्थेवर विकास पॅनलचे वर्चस्व, तेरा पैकी आठ उमेदवारांचा दणदणीत विजय

८२८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, माधवअण्णा लोकुलवार तिसऱ्यांदा संचालक

परभणी पोलीस सहकारी पतसंस्थेवर विकास पॅनलचे वर्चस्व, तेरा पैकी आठ उमेदवारांचा दणदणीत विजय

परभणी : येथील परभणी पोलीस पतसंस्थेच्या २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी संचालकांच्या १३ जागांसाठी रविवारी (दोन एप्रिल) झालेल्या निवडणुकीत विकास पॅनलच्या तेरापैकी आठ उमेदवारांनी विजय संपादन करून बहुमत मिळवत, पतसंस्थेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मतमोजणीनंतर लगेच निकाल जाहीर करण्यात आला. विकास पॅनलचे प्रमुख माधवअण्णा लोकुलवार व सदाशिवबापू काळे यांच्यावर मतदारांनी विश्वास दाखवून केलेल्या कामाची पावती दिली आहे. सर्वांना बहुमताने निवडून दिले आहे. माधवअण्णा यांना तिसर्‍यांदा संचालक होण्याचा मान मिळाला आहे.‌‌ एकूण ८२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीनंतर लगेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष काळे यांनी निकाल जाहीर केला.

विजयी उमेदवारांची नावे अशी :

सर्वसाधारण प्रतिनिधी मतदार संघ : नाथराव उपलेचवार ४३६,  बालाजी कच्छवे ४३२, दीपक केजगीर ४२०, शंकर गायकवाड ४४८, महेशकुमार पांगरकर ४२१, माधव लोकुलवार ४५४, नरेश सिरसकर ४४७, गजानन क्षीरसागर ४५७, महिला राखीव प्रतिनिधी मतदार संघ : जयश्री राठोड ४१०, संघमित्रा होळकर ४५८, इतर मागासवर्गीय राखीव प्रतिनिधी मतदार संघ : सदाशिव काळे ४१०,  विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग राखीव प्रतिनिधी मतदारसंघ : संतोष नीलपत्रेवार ४९७, अनुसुचित जाती-जमाती राखीव प्रतिनिधी मतदार संघ : हेमराज नैताम ४३१

जिल्हा उपनिबंधक उमेशचंद्र हुसे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी संतोष काळे, निवडणूक अधिकारी म्हणून ए.आर.तांबोळी, बी.एस. कुरूडे, नुसरत शेख, बी.टी.लिंगायत आदींनी काम पाहिले. अशोक राठोड, मनोज चोधरी, अमृत सोनवणे, अमोल सोनटक्के, गोविंद कदम, अजय टाक, शेख सय्यद, गुलाब पौळ, प्रभाकर शातलवार आदींनी सहकार्य केले.

सर्व पोलीस बांधव व पोलीस अधिकारी यांचे मनापासून खूप आभार. सर्व सभासद बांधवांच्या सूचनाचे पालन नवनिर्वाचित संचालक मंडळाकडून निश्चितपणे केल्या जाईल. सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. विजयी व प्रतिस्पर्धी पॅनलच्या सर्व उमेदवारांनी एकदिलाने व आनंदाने निवडणूक पार पडली. सर्वांचे अभिनंदन !

– माधवअण्णा लोकुलवार, सदाशिवबापू काळे , विकास पॅनलप्रमुख 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!