‘पसायदान’ : सेलूत उद्यापासून चैतन्य महाराज देगलूरकरांची प्रवचनमाला
प्रवचनमालेचे चौथे वर्ष, उपस्थित राहण्याचे आवाहन
सेलू (जि.परभणी) : सेलू येथील वसंत प्रतिष्ठान व खारकर परिवाराच्या वतीने गुरुवारपासून ( सहा एप्रिल) तीन दिवस चैतन्य महाराज देगलूरकर यांची ‘पसायदान’ प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे. प्रवचनमालेचे हे चौथे वर्ष आहे. सेलू (जि.परभणी) येथील साईबाबा मंदिर सभामंडपात शनिवारपर्यंत ( ८ एप्रिल ) दररोज सायंकाळी सहा वाजता प्रवचनमालेला सुरूवात होणार आहे. श्रोत्यांनी, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उद्योजक महेश खारकर, विधीज्ञ उमेश खारकर, खारकर परिवार आणि संयोजन समितीने केले आहे.