पक्षी अधिवासाने हदगाव तलाव सुंदर; सेलूतील निरीक्षकांचा अभ्यास

पक्षी अधिवासाने हदगाव तलाव सुंदर; सेलूतील निरीक्षकांचा अभ्यास

वारकरी व छोटी अडईसह वीसहून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांची वाढती वर्दळ

पक्षी अधिवासाने हदगाव तलाव सुंदर; सेलूतील निरीक्षकांचा अभ्यास

सेलू (जि.परभणी) : तालुक्यातील हादगाव पावडे गावच्या पूर्वेला असलेल्या तलावाचे सौंदर्य बहरत आहे. इथे सायंकाळी पाणपक्ष्यांची शाळा भरत आहे. वारकरी व छोटी अडईसह वीसहून अधिक प्रजातीचे पक्षी मोठ्या संख्येने येथे वास्तव्य करून आहेत. यामुळे सेलूतील पक्षीनिरीक्षकांच्या अभ्यासलाही चालना मिळाली आहे.
हदगावच्या दक्षिणेला दगडाच्या मोठ्या खाणी आहेत. पूर्वेला एक पाझर तलाव आहे. तलावातील पाणी उथळ असून बेशरम, लव्हाळ्याची बेटं यामध्ये आढळून येतात. सेलूतील विजय ढाकणे आणि माधव गव्हाणे यांनी या तलावावर पक्षी निरीक्षण करून नोंदी घेतल्या आहेत.
वारकरी (Common Coot), Lesser Whistling Duck), छोटा खंड्या (Common Kingfisher), जांभळी पाणकोंबडी (Purple Moorhen) साधी पाणकोंबडी (White breasted Swamphen) नदी सुरय (River Tern), हळदी कुंकू बदक (Spot billed duck), छोटा पाणकावळा (Little Cormorent), जांभळा बगळा (Purple Heron ), राखी बगळा (Grey Heron ), टीबुकली (Little Grebe), टिटवी (Red Wattled Lawpwing), लालसरी (Common Pochard) आदींसह इतर अनेक पक्षी याठिकाणी आढळून येत असल्याची माहिती विजय ढाकणे यांनी दिली.

 

पक्षी अधिवासाने हदगाव तलाव सुंदर; सेलूतील निरीक्षकांचा अभ्यास

तलावातील बेशरम आणि लव्हाळाची बेट पाणपक्ष्यांना घरटे बनवण्यासाठी उपयोगी पडतात. पाणवनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पक्ष्यांना खाद्य मुबलक आहे. एकूणच अधिवास चांगला असल्याने अनेक पाणपक्ष्यांची वर्दळ वाढली आहे.

– विजय ढाकणे, माधव गव्हाणे,
पक्षी निरीक्षक, सेलू जि.परभणी

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!