सेलूचा विश्वजीत बोराडे ‘एनडीए’साठी पात्र; श्रीराम प्रतिष्ठानकडून कौतुक
परभणी : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौसेना अकादमी (NA) प्रवेशासाठी एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित प्रिन्स इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी विश्वजीत विक्रम बोराडे प्रवेशपात्र झाला आहे.या यशाबद्दल अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ. रामराव रोडगे, डॉ.आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, नारायण चौरे, अर्जुन गरुड आदींनी विश्वजीतचे कौतुक केले आहे.