डॉ.शैलेश मालाणी यांची आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड

डॉ.शैलेश मालाणी यांची आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड

सेलू जि.परभणी : येथील त्वचाविकार तज्ज्ञ डॉ.शैलेश शिवनारायण मालाणी यांची सिंगापूर येथे आयोजित २५ व्या ‘वर्ल्ड कॉंग्रेस ऑफ डर्मेटॉलॉजी आंतरराष्ट्रीय परिषदे’ साठी निवड झाली आहे. दोन ते आठ जुलै या कालावधीत ही परिषद होत आहे. टक्लल पडणे यावरील उपचार, त्वचेचे क्षयरोग, कुष्ठरोग, रक्ताच्या गाठी, मज्जातंतू, मधुमेहाच्या औषधांचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम, शीरांमधील गाठी आदी सात प्रकारच्या त्वचा विकारातील विषयांवरील लेखांचे पोस्टर डॉ.मालणी परिषदेमध्ये सादर करणार आहेत. यासाठी त्यांना डॉ. तपीश खियाणी, डॉ.स्वागत शहा यांचे सहकार्य, तर डॉ.संजय गोरे, डॉ.चेतन राजपुत, डॉ. महेश उन्नी, डॉ.भूषण मडके, डॉ.मंगेश निकम यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ.शैलेश मालाणी यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!