सेलूतील नूतन विद्यालयाचे ४० विद्यार्थी शिष्यवृत्तीपात्र; उज्ज्वल यशाची परंपरा कायम

सेलूतील नूतन विद्यालयाचे ४० विद्यार्थी शिष्यवृत्तीपात्र; उज्ज्वल यशाची परंपरा कायम

संस्था, शाळा पदाधिकारी यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक 

परभणी : सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालयातील इयत्ता पाचवी व आठवीचे ४० विद्यार्थी शिष्यवृत्तीपात्र ठरले आहेत. यानिमित्ताने संस्थेने गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. 

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल रविवारी, ३० एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आला. राज्याचा शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 22 टक्के, परभणी जिल्ह्याचा 14 टक्के, तर नूतन विद्यालयाचा संकलित निकाल 23 टक्के आहे. अंतिम निकालानंतर पात्र विद्यार्थ्यांतून शिष्यवृत्तीधारकांची गुणवत्ता यादी शिक्षण परिषद प्रसिद्ध करीत असते. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता आठवीचे श्लोक कुलकर्णी (248), पियुष मुनेश्वर (242), महेश भाबट (220), यज्ञेश्वर टोम्पे (212), रितेश लहाने (200), विवेक गव्हाणे (200), विकास घुगे (198), वरद बरकुले (194), सिद्धांत नागरे (192), तन्मय कुलकर्णी (190), कान्हा रणेर (182), श्रेया मुजमुले (182), हनुमान खेडकर (178), प्रसाद पावडे (174), नकुल मगर (172), नीलेश झोल (168), समर्थ कुरधने (166), प्रथमेश बोराडे (164), हर्ष पिंगळे (160), युवराज फासाटे (160), सृष्टी सोलापूरे (160), सय्यद कय्युम (160), मीत पुरणाळे (158), ओंकार शिंगणे (152), स्वराज जाधव (152), वैष्णवी पिंपळगावकर (146 ), अद्वैत पाटील (146) या विद्यार्थ्यांसाचा समावेश आहे. इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीपात्र यादीत कृष्णा गोविंदा अंबुरे (142), श्रीराम सतीशराव खिस्ते (128), मेघना मनीष हुगे (128), शिवांक्ष सोमशंकर कांदळे (198), विनया रुस्तुम घुले (156), गोपाल किरण कुलकर्णी (180), ज्ञानेश्वर श्रीराम इलग (164), प्रथमेश अरुण पावडे (158), आर्यन वैजनाथ वैद्य (190), आशीर्वाद वसंत नंदनकर (150), ओम राजेश धापसे (154), धनुष प्रजीत रावते (196) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विभाग प्रमुख एस.आर.तोडकर, बी.एन.पद्मावत,ए.एल.अंबेकर, व्ही.आर.कडगे आदींसह भाषा,गणित व विज्ञान, समाज शास्त्र विषय शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. शिष्यवृत्तीधारकांची‌ राज्य, जिल्हा व तालुका गुणवत्ता यादी अंतिम निकालानंतर जाहीर होते. त्यासाठी शाळेचे ४० विद्यार्थी पात्र झाले आहेत. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे गुरुजी, सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक एन.वाय.सोळंके, उपमुख्याध्यापक एस.व्ही.पाटील, के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर आदींसह संस्था पदाधिकारी, सदस्य व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


सुरेखा रामदासींचा सेवागौरव; नूतन कन्या शाळेत कार्यक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!