सुरेखा रामदासींचा सेवागौरव; नूतन कन्या शाळेत कार्यक्रम
सेवानिवृत्तबद्दल रामदासी यांचा सत्कार, संस्था पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती
सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेतील जेष्ठ शिक्षका सुरेखा रामदासी-चारठाणकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त शुक्रवारी (२८ एप्रिल) सहकुटुंब सेवागौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे गुरुजी, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोर बाहेती, सत्कारमूर्ती सुरेखा रामदासी, यशवंत चारठाणकर, मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दतराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ” सहशिक्षिका म्हणून सुरेखा रामदासी यांनी नूतन कन्या प्रशालेत ३८ वर्ष प्रदीर्घ सेवा पूर्ण केली. व्यक्तीचे आयुष्य जीवन गाणे व्हावे आणि त्यातून आदर्श जीवन फुलत जावे, असे आदर्शवत आयुष्य रामदासी व त्यांच्या कुटुंबीयांनी आजवर अनुभवले. जगले. त्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा,” अशा शब्दांत प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांनी रामदासी यांचा गौरव केला. याप्रंसगी सुरेखा रामदासी व यशवंतराव चारठाणकर यांचा शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
मुख्याध्यपिका संगीता खराबे, वैशाली चारठाणकर, भक्ती मसलेकर, किशोर विश्वामित्रे, ज्योती कुंभकर्ण, कीर्ती राऊत, योगिनी चारठाणकर, हेमलता जोशी, आशा चौरे, शंतनु पाठक, सुजाता रामदासी यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेखा रामदासी यांनी कृतज्ञतापूर्वक भावना व्यक्त केल्या.अध्यक्षीय समारोपात लोया यांनी शुभेच्छा दिल्या. यशवंतराव चारठाणकर यांनी अभंग सादर करीत आपले मनोगत व्यक्त केले. स्वागतगीत किशोर ढोके यांनी गायीले. याप्रसंगी विज्ञान प्रदर्शनासाठी राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल समृद्धी शरद लाये या विद्यार्थिनीचा, पालक, मार्गदर्शक शिक्षिका वैशाली चव्हाण, तसेच राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल कीर्ती राऊत यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुषमा दामा यांनी केले. भालचंद्र गांजापुरकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी संस्था कार्यकारणी सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, अजीजखाँ पठाण, प्राचार्य डॉ.महेंद्र शिंदे, उमेश खारकर, महेश खारकर, प्रकाश कुरुंदकर, सुरेश रणखांबे, माजी उपमुख्याध्यापक पी.एम. रोडगे, जी.बी.पिंपळे, सुधाकर भागवत, श्याम बारस्कर, गोदावरी कंधारे आदींसह स्नेहजणांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शशिकांत देशपांडे, यशवंत कुलकर्णी, सीमा सुक्ते, अनंत बोराडे, नागेश देशमुख, गजानन मजगे, शिक्षक व कर्मचार्यांनी पुढाकार घेतला.
” सहशिक्षिका म्हणून सुरेखा रामदासी यांनी नूतन कन्या प्रशालेत ३८ वर्ष प्रदीर्घ सेवा पूर्ण केली. व्यक्तीचे आयुष्य जीवन गाणे व्हावे आणि त्यातून आदर्श जीवन फुलत जावे, असे आदर्शवत आयुष्य रामदासी व त्यांच्या कुटुंबीयांनी आजवर अनुभवले. जगले. त्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा,” अशा शब्दांत संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांनी रामदासी यांचा गौरव केला.
अजंता, नरसापूरला सेलूत थांबा; रेल्वेमंत्री दानवे यांची ग्वाही
सेलूतील ‘अक्षर आनंद’उत्कृष्ट बालवाचकांचा गौरव
प्रस्थापितांना दणका : सेलू बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता; नव्या कारभाऱ्यांना संधी