सेलूतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; आर्य वैश्य महासभेचा उपक्रम

सेलूतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; आर्य वैश्य महासभेचा उपक्रम

सेलू : येथील आर्य वैश्य महासभातर्फे कुलस्वामिनी वासवीमाता कन्याका परमेश्वरी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. रविवारी, ३० एप्रिल रोजी साईबाबा मंदिर सभामंडपात हे शिबिर झाले. उद्घाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य रामनाना खराबे, बालरोगतज्ञ डॉ.सुबोध माकोडे, एलआयसी विकास अधिकारी उपेंद्र बेलूरकर, भारत डख, पंकज खेडकर, डॉ.व्यंकटेश पेडगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. न्यू लाईफ ब्लड बँकतर्फे रक्त संकलन करण्यात आले. यानिमित्ताने तायनाक महाराज यांचे प्रवचन व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमांसाठी माधवअण्णा लोकुलवार, मोहन कोत्तावार,अनिल बंडेवार, बालाजी काचेवार, नागनाथ कलकोटे, संजय कोटलवार, शिवाजी काचेवार, बालाजी मोटरवार, किशोर गादेवार, विकास गादेवार, साईनाथ पेंडगुलवार, प्रवीण कोत्तावार, शशिकांत मालशेटवार, योगेश कोटलवार, गणेश काचेवार, प्रसाद काचेवार, जीवन तम्मेवार, गजानन फुटाणे, ज्ञानेश्वर राजकोंडवार, योगेश काचेवार, गोविंदा दाचावार, ज्ञानेश्वर फुटाणे, राजेश पामे, साई गादेवार, मनोज कोत्तावार, सौरभ कोत्तावार, तेजस कालकोटे, पार्थ दाचावार व आर्य वैश्य महासभा पदाधिकारी व सदस्य, महिला आघाडी, आर्य वैश्य युथ यांनी परिश्रम घेतले.


अजंता, नरसापूरला सेलूत थांबा; रेल्वेमंत्री दानवे यांची ग्वाही

सेलूतील ‘अक्षर आनंद’उत्कृष्ट बालवाचकांचा गौरव

प्रस्थापितांना दणका : सेलू बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता; नव्या कारभाऱ्यांना संधी

सुरेखा रामदासींचा सेवागौरव; नूतन कन्या शाळेत कार्यक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!