सेलूतील ‘अक्षर आनंद’उत्कृष्ट बालवाचकांचा गौरव

सेलूतील ‘अक्षर आनंद’उत्कृष्ट बालवाचकांचा गौरव

सेलू : मोबाईल व टीव्हीच्या अतिरेकी वापरामुळे मुलांची मने अस्थिर होत आहेत. पुस्तक वाचन, आत्मचिंतनातून मने स्थिर घडतात . यासाठी बालकांवर वाचन संस्कार व्हावेत या उद्देशाने अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राने पुस्तक वाचन उपक्रम घेतला आहे. त्यातील सेलू तालुक्यातील उत्कृष्ट बालवाचकांचा गौरव रविवारी, ३० एप्रिल रोजी करण्यात आला.
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी गझलकार संजय विटेकर होते, तर प्रमुख पाहुणे प्राध्यापक अनंत मोगल, कवी सुरेश हिवाळे, साने गुरुजी कथामालेच्या कल्पना हेलसकर होत्या.

पुस्तक वाचून त्यानुसार जगले पाहिजे, असे प्रा.मोगल या वेळी म्हणाले. या उपक्रमामुळे मुलांचे समजपूर्वक वाचन घडत आहे, असे कल्पना हेलसकर यांनी सांगितले . या वेळी युवराज माने, सुरेश हिवाळे, संजय विटेकर यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक अक्षर आनंदचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे, तर सूत्रसंचालन साहित्यिक शरद ठाकर यांनी केले.आभार संदीप आकात यांनी मानले. माजी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, ग्रंथपाल महादेव आगजाळ, प्रदीप शिंदे, विष्णू काळे, गोविंद रोकडे, माऊली राठोड यांचे उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य मिळाले.


अजंता, नरसापूरला सेलूत थांबा; रेल्वेमंत्री दानवे यांची ग्वाही

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!