सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानचे 41 विद्यार्थी शिष्यवृत्तीपात्र
प्रिन्स इंग्लिश स्कूलचे 28, तर ज्ञानतीर्थ विद्यालयाचे 13 विद्यार्थ्यांचा समावेश, संस्थेकडून विद्यार्थ्यांचे कौतुक
सेलू.जि.परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलचे 28, तर ज्ञानतीर्थ विद्यालयाचे तेरा असे एकूण 41 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलचे इ. 5 वी चे 14 विद्यार्थी व इ. 8 वी चे 14 असे एकूण 28 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
वर्ग 5 वी मधून श्रुती गोविंद कदम (230), तत्वमसी प्रतापसिंग शिंदे (230), समर्थ अनंता तेलभरे ( 222), प्रज्वल राजेश बासिबे (210), अभिराज भारत मोगल (208), अथर्व प्रशांत चव्हाण (176), यश गिरीश साडेगावकर ( 176), ऋतुराज नारायणराव चट्टे (174), रिद्धी सतीश करवा (172), वरद वैजनाथ गिरी (160), सौरभ नारायण मोगल (156),प्रणव नंदकुमार फंड (146), शौर्य दत्तात्रय काकडे (144) आर्या जिजाभाऊ डख (132), तर वर्ग 8 वी मधून श्रुती महादेव हाडोळे (232), स्नेहल अण्णासाहेब लंगडे (206) ,अथर्व दत्तात्रेय नंद (108) , पृथ्वीराज कल्याणराव चव्हाण (186) आदित्य शिवाजी लाटे ( 170) अंकिता पुरुषोत्तम ताईनाक (164) साहिल विलास राठोड (162) आरुष प्रथमेश राठी (150) नैतिक अमोल काला ( 146) आदीश अमोल कदम ( 142) सानवी सुनील गायकवाड (138) पुष्कर प्रशांत पुरी (134) अवधूत विनोद सातोनकर (132) दृशिका निशांत दगडू (130) हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ सविता रोडगे, डॉ रामराव रोडगे, डॉ आदित्य रोडगे, डॉ अपूर्वा रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, नारायण चौरे, पर्यवेक्षक अर्जुन गरुड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
ज्ञानतीर्थ विद्यालयाचे 13 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इ.5 वी वर्गातील मयुरेश सोळंके, सिद्दी सुवर्णकर, समर्थ मचाले, गौरव घुमरे, कार्तिक जोगडे, ऋचा फुटाणे असे एकूण 6 विद्यार्थी पात्र ठरले. त्याचबरोबर इ.8 वीतील प्रियंका बुधवंत, संस्कृती सोळंके, बालाजी सूर्यवंशी, श्रावणी चौधरी, मयंक जैन, प्रतीक मगर, सृष्टि रोडगे असे एकूण 13 विद्यार्थी पात्र ठरले. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनीचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे, सचिव डॉ सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके यांनी कौतुक केले आहे.
अजंता, नरसापूरला सेलूत थांबा; रेल्वेमंत्री दानवे यांची ग्वाही