सेलूत गुरुवारपासून रामदासी कीर्तन शिबिर ; विविध कार्यक्रमांची रेलचेल 

सेलूत गुरुवारपासून रामदासी कीर्तन शिबिर ; विविध कार्यक्रमांची रेलचेल 

विविध पुरस्कारांचे वितरण, मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

 

सेलू : येथील श्री केशवराज बाबासाहेब संस्थान व स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तनकुल यांच्यावतीने गुरुवारपासून (११ मे) रामदासी कीर्तन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने दहा दिवस विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. रविवारी (२१ मे) समारोप आहे.

कीर्तन प्रशिक्षण शिबिराचे हे सहावे वर्ष आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता कालिदास महाराज बोरीकर (गुंज) व भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन आहे. यावेळी ध्वजपूजन, ध्वजारोहण व उद्घाटनसत्र आदी कार्यक्रम आहेत. शुक्रवारी, १२ मेरोजी श्री गणेशबुवा रामदासी (छत्रपती संभाजीनगर), शनिवारी १३ मे रोजी पुणे येथील नम्रता व्यास, रविवारी १४ मे रोजी गोंदी येथील प्रकाशभाऊ मुळे, सोमवारी, १५ मेरोजी मालाड येथील गौरी खांडेकर, मंगळवार १६ मे रोजी धनगर टाकळी येथील अवधूत बुवा टाकळीकर, तर बुधवार, १७ मे ते शुक्रवार, १८ मे नृसिंहवाडी येथील शरदबुवा घाग, यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन दररोज सायंकाळी ८ ते १० दरम्यान होणार असून, दहा दिवस चालणाऱ्या कीर्तनासाठी संवादिनीची साथ मंगेश जवळेकर व लक्ष्मीप्रसाद पटवारी आणि तबल्याची साथ संकेत शार्दुल , प्रभाकर पुजारी, मयूर काकडे देणार आहेत.‌ शनिवारी,२० मे रोजी सायंकाळी ७.३० ते ९ दरम्यान पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंहभारती स्वामी जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर करवीर पीठ यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सज्जनगड येथील समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी व बीड येथील आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज हे देखील यावेळी पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. यावर्षी आयोजकांच्यावतीने देवर्षी नारद पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील गणेशबुवा रामदासी यांना, तर वेदव्यास पुरस्कार जालना येथील भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर तसेच स्वामी विवेकानंद पुरस्कार अमरावती येथील भक्ती (हरिप्रिया)अरविंद देशमुख यांना गौरविण्यात येणार आहे. रविवारी २१ मे रोजी सकाळी १० वाजता अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने शिबिराची सांगता होणार आहे. शहर परिसरातील भाविकांनी शिबिरातील विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री केशवराज बाबासाहेब संस्थान व स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तन कुल यांच्यावतीने करण्यात आले आहे.

या वर्षी आयोजकांच्यावतीने देवर्षी नारद पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील गणेशबुवा रामदासी यांना, तर वेदव्यास पुरस्कार जालना येथील भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर तसेच स्वामी विवेकानंद पुरस्कार अमरावती येथील भक्ती (हरिप्रिया)अरविंद देशमुख यांना गौरविण्यात येणार आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!