सेलूतील नोकरी मेळाव्यात २१९ जणांना नियुक्तीपत्र; डॉ.संजय रोडगे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

सेलूतील नोकरी मेळाव्यात २१९ जणांना नियुक्तीपत्र; डॉ.संजय रोडगे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांची उपस्थिती,वाढदिवसानिमित्त डॉ.रोडगे यांचा सत्कार 

सेलू : श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (७ मे) नोकरी महामेळावा झाला. यामध्ये २१९ जणांनी रोजगार नियुक्ती पत्र देण्यात आले.  

भारतीय जनता पक्ष व श्रीराम प्रतिष्ठान सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने विद्याविहार संकुल परिसरात हा कार्यक्रम झाला. आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिभाऊ लहाने होते. सत्कारमूर्ती डॉ.संजय रोडगे, माजी सभापती दिनकर वाघ, रवींद्र डासाळकर, विठ्ठलराव डख,सुंदर गाडेकर, बाजार समिती सदस्य दत्ता कदम, प्रसाद डासाळकर, अनिल पवार, भास्कर पडघन , गणेश आकात, ज्ञानदेव जायभाये , लहानाप्पा हरकळ, सुदाम रोकडे, रामा डख, दत्ता तांबे, भाऊराव डख, कपिल फुलारी, अविनाश शेरे, संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे, डॉ.आदित्य रोडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलातांना आमदार बोर्डीकर म्हणाल्या, ” अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम डॉ.संजय रोडगे मित्र मंडळाने केले आहे. हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. सेलूतील ‘एमआयडीसी’ प्रकल्प प्रलंबित आहे. तो एकदा मार्गी लागला, की अनेकांना रोजगार उपलब्ध होईल यासाठी निश्चितच प्रयत्न करेल. ”

या वेळी हरिभाऊ लहाने व डॉ. संजय रोडगे यांनी मनोगत व्यक्त केले. वाढदिवसानिमित्त डॉ.संजय रोडगे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय ठाकर यांनी केले. आभार प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे यांनी आभार मानले

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!