FLOORBALL : पुणे, नागपूरला विजेतेपद; सेलूत राज्य शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा उत्साहात
छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक, कोल्हापूर संघांनीही पारितोषिक
सेलू जि.परभणी : मुलामुलींच्या विविध गटांत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय फ्लोअर बॉल सेलू (जि.परभणी) येथे उत्साहात पार पडल्या. यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत पुणे, नागपूर संघानी विजेतेपद पटकाविले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, परभणी जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, व परभणी जिल्हा फ्लोअर बॉल असोसिएशन, यांच्या संयुक्त सहकार्याने सहा व सात मेरोजी महेश ॲग्रो इंडस्ट्रीजच्या मैदानावर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार विजयराव भांबळे यांनी केले. नूतन विद्यालय शिक्षण संस्थाध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया, प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सचिव रमेश चोथवे, अशोक काकडे, सीताराम मंत्री, राजेंद्र लहाने, शैलेंद्र गौतम, संजय मुंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत राज्यभरातून आठ विभागाचे मुले व मुलींचे १६ संघातील ४८० खेळाडू सहभागी झाले होते.
विजेते संघ : १९ वर्षे मुले गट : प्रथम : पुणे, व्दितीय : नागपूर, तृतीय: छत्रपती संभाजीनगर, १९ वर्ष मुली गट : प्रथम : नागपूर, व्दितीय : नाशिक, तृतीय: पुणे १७ वर्षे मुले गट : प्रथम : पुणे, व्दितीय : लातूर, तृतीय : कोल्हापूर, १७ वर्षे मुली गट : प्रथम : नागपूर, व्दितीय: नाशिक, तृतीय: कोल्हापूर
विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या वेळी फ्लोअरबॉलचे राज्य सचिव चिटणीस रवींद्र चोथवे, महेश ॲग्रो इंडस्ट्रीजचे संचालक विपीन मंत्री, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दत्ता गलांले क्रीडा अधिकारी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन जिल्हा योगशिक्षक डी.डी.सोन्नेकर, तर जिल्हा सचिव प्रशांत नाईक यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, फ्लोअरबॉल जिल्हाध्यक्ष अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, प्रशांत नाईक, भारत घांडगे,अनुराग आमटी, बालाप्रसाद राठोड, सोनू नाईक, कुणाला चव्हाण, स्वप्निल चव्हाण, सत्यम बरकुले आदींनी परिश्रम घेतले.