Brahmakumaris : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी ‘शांतिवन’ सज्ज; ग्लोबल हॉस्पिटलसह विविध उपक्रमांचा शिलान्यास

Brahmakumaris : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी ‘शांतिवन’ सज्ज; ग्लोबल हॉस्पिटलसह विविध उपक्रमांचा शिलान्यास

शांतिवन परिसरात चैतन्य फुलले, राजयोग शिबिरात देशभरातील नागरिकांचा उत्साहपूर्ण सहभाग

Authored By Babasaheb Helaskar

माऊंट अबू रोड (राजस्थान), दि.९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (१० मे) राजस्थान दौर्‍यावर आहेत.‌‌ दुपारी तीन वाजता ब्रह्माकुमारीज् शांतिवनमध्ये आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होत आहेत. यानिमित्ताने ग्लोबल हॉस्पिटल, शिवमणी वृद्धाश्रम आदी विविध उपक्रमांचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

पंतप्रधान मोदी बुधवारी माऊंट अबू रोड येथील हेलिपॅड मैदानावर आयोजित जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अबूरोडमध्ये ठिकठिकाणी स्वागत कमानी, फ्लेक्स उभारण्यात आले आहेत.

‘शांतिवन’ मधील डायमंड व्हॉलमध्ये दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. यानिमित्ताने ब्रह्माकुमारीजच्या ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेज, सुपरस्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल, शिवमणी वृद्धाश्रम, नर्सिंग कॉलेज आदींचा शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर शांतिवनमध्ये ब्रह्माकुमारीज् संस्थेकडून पंतप्रधानांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. प्रसन्न वातावरण आहे. शांतिवन परिसरात मोदी यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले आहेत. केंद्र व राजस्थान सरकारच्यावतीने शांतिवनमध्ये मोठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दोन ते सात मेपर्यंत शांतिवनमध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, दिल्ली, मुंबई, गुजरात, राजस्थानमधील नागरिकांसाठी राजयोग शिबिर पार पडले. सोमवारपासून (८ मे) नेपाळ, कर्नाटक, ओरिसा, बिहार, झारखंडमधील नागरिकांसाठी राजयोग शिबिर होत आहे. संस्थेच्या वतीने शिबिरार्थींसाठी उत्तम दर्जाची भोजन, निवास, वाहतूक, आरोग्य व अन्य सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. सेवा सहकार्यामध्ये देशभरातील ब्रह्माकुमारी बहेन, भाई यांचा मोठा सहभाग आहे.

‘स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन’ हे सर्वोच्च ध्येय आणि ज्ञान मुरली, सहज योग, दिव्य गुणांची धारणा आणि ईश्वरीय सेवा या उद्दात उद्देशाने माऊंट अबू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे कार्य अविरत सुरू आहे. या अंतर्गत राजयोग शिबिराचे आयोजन केले जाते.  ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे हे वर्ष ‘सकारात्मक परिवर्तन वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. या अनुषंगाने देश विदेशातील ब्रह्माकुमारी सेंटरमध्येही विविध उपक्रम हाती घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.


राजस्‍थान में बढ़ी राजनीतिक हलचल, पीएम नरेंद्र मोदी के दौरे से एक दिन पहले आज माउंट आबू पहुंचेंगे राहुल गांधी

भारत गौरव पुरस्कार : आमदार मेघना बोर्डीकरांचा ब्रिटन संसदेत शुक्रवारी गौरव

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!