Art of Living : रवळगावची वसतिशाळा दत्तक;श्रीश्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त सेलू परिवाराचा उपक्रम

Art of Living : रवळगावची वसतिशाळा दत्तक;श्रीश्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त सेलू परिवाराचा उपक्रम

शैक्षणिक साहित्याचे केले मोफत वाटप

सेलू, दि.१३ / प्रतिनिधी : आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक विश्वशांतिदूत श्रीश्री रविशंकरजी यांचा वाढदिवस सेलू (जि.परभणी) येथील परिवारातर्फे रवळगाव येथील जिल्हा परिषद वसतिशाळा दत्तक घेऊन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 

जगभरात श्रीश्रींचा वाढदिवस उत्साहात साजरा केला जातो. साधकांमार्फ़त जगभरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवीले जातात.शनिवारी, १३ मे रोजी सेलू परिवारातर्फे रवळगाव येथील जिल्हा परिषद वस्तिशाळा रवळगाव शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी दत्तक घेण्यात आली. या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, वह्या, पेन, पेन्सिल, टिफिनबॉक्स, वॉटर बॉटल आदी साहित्य शनिवारी मोफत उपलब्ध करुन देण्यात आले. अशी माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे परभणी जिल्हा समन्वयक किशोर घडे यांनी दिली. या वेळी ऊपसमन्वयक कैलाश कदम प्रकाश चचेडिया, नितिन सोळंके, गोपाळ हेलसकर, अनूप गुप्ता, रुचिका गुप्ता, बालासाहेब सोनटक्के, जयसिंग शेळके आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!