CBSE RESULTS : समृद्धी काकडे सर्वप्रथम; सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश
डॉ.संजय रोडगे यांची माहिती : दहा विद्यार्थ्यांचा सीजीपीए ग्रेड दहा, २२ विद्यार्थी ९० टक्क्यांवर
सेलू : सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत सेलू (जि.परभणी) येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेच्या दहा विद्यार्थ्यांचा सीजीपीए दहा आला आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी शुक्रवारी, १२ मे रोजी दिली.
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल घोषित केला. या वर्षी समृद्धी काकडे ९९ टक्के गुण मिळवून शाळेतून सर्वप्रथम आहे.द्वितीय शिवम शिंदे ९८.२०, तृतीय आयुष मोदानी ९७.४०, अमन शेख याने ९६.४० टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक मिळविला. श्रावणी जाधव व महेश सोळंके ९६.२०, वेदश्री चट्टे ९५.२०, प्रांजल साडेगावकर ९४.६० आरती भारतीय ९४.६०, पुष्कर घाडगे ९३.६०, लोकेश गिल्डा ९३.६० तन्वी सोमानी ९३.२० शाहिद अन्सारी ९२.२०, युग बिनायके ९२.६०, चैतन्य उन्हाळे ९२.४०, अर्पिता हिवरे ९२.२० पंकज बागवाले ९१.२०, रोहित चौधरी ९०.८०, गणेश टापरे ८९.६०, प्रशिक साळवे ८९.४०, रघुनाथ जाधव ८९.४०, प्रथम शहा ८९.४० अब्दुल बारी अन्सारी ८८.८०, भक्ती साबू ८८.४०, सेजल साडेगावकर ८८.२०, धनश्री बोराडे ९५.२०, धन्वंतरी सोळंके ८५.००, उरुज खान ८५.००, पार्थ खरात याने ८४.४० टक्के गुण मिळविले आहेत. २२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांवर गुण आहेत. ३३ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण आहेत, तर ४१ विद्यार्थ्यांना ७० टक्क्यांवर गुण आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.आदित्य रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, नारायण चौरे, अर्जुन गरुड, बाजीराव मोगल आदींसह शिक्षक व कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.