मुख्यजलवाहिनीला भगदाड; जुन्या सेलूचा पाणीप्रश्र गंभीर

मुख्यजलवाहिनीला भगदाड; जुन्या सेलूचा पाणीप्रश्र गंभीर

रस्ते काम सुरू असताना फुटली जलवाहिनी, दुरुस्तीचे काम सुरू…

सेलू/परभणी : सेलू येथील परभणी रोडवरील अरबी मदरसा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. खोदकामात जुन्या सेलू शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे. हजारो लिटर पाणी वाया जात नाही. यामुळे जुन्या सेलू भागातील पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. टँकरने पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी होत आहे,
या जलवाहिनीतून जून्या पाणी टाक्यात साठवणूक होत होती. जलवाहिनी फुटल्यामुळे साठवणूक बंद झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे नगरपालिकेने ज्या ज्या भागात पाणी मिळणार नाही त्या भागात टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे

पालिकेचे आवाहन

सेलू शहरातील स्टेशन रोड,क्रांती चौक,मोंढा परिसर,गणपती गल्ली,सूरज मोहल्ला,राज मोहल्ला,मसोबा चौक,जव्हेरी गल्ली,मारवाडी गल्ली,नाला रोड,भोई गल्ली,जैन मंदिर रोड,शेरे गल्ली,सुभेदार गल्ली,बन्सीलाल नगर,पारधी वाडा, राजीव गांधी नगर,अजिंठा कॉलोनी,घिसेखा नगर,पोलीस क्वार्टर,दत्त नगर आदी भागात सारंगी गल्ली येथील जलकुंभावरून केला जाणारा पाणी पुरवठा जल वाहिनीच्या बदलीचे काम करण्यासाठी दि.३०.०५.२०२३ पासून पुढील ८ दिवस बंद करण्यात येत असून नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन सेलू पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

.

.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!