सेलूतील एलआयसी शाखेत अधिकार्‍यांचा सत्कार

सेलूतील एलआयसी शाखेत अधिकार्‍यांचा सत्कार

सेलू, दि.१६ : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखेचे प्रशासन अधिकारी भूषण बक्षी यांची बदली, तर नागेश पुराणिक यांनी सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बक्षी व पुराणिक यांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी शाखा व्यवस्थापक संतोष कोडगिरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपेंद्र बेल्लुरकर उपस्थित होते. भूषण बक्षी यांचा सेलू शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला, तर नागेश पुराणिक यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. या वेळी योगेश जायभाये, शमशोदीन शेख, अरुण चाटे, शुभम जोशी, मन्मथ देवढे, संपत कपाळे, गोपाळ गाडगे, शिवाजी अघाव, राजकुमार नाईकवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अविनाश जोशी, सुनील वाकळे, अजय पुंडलिक, सुभाष दाभाडकर, श्रीपती जगताप, भालचंद्र बरडे, भारत कोलते, नामदेव मुंढे, अरुण साळवे, शंकर जिवणे, संदीप जाधव, अमीर शेख, गजानन वाकडीकर, नितीन भिसे, गोविंद कारके आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!