चारठाणकर पुरस्कार : चिन्मयी सुमित यांचा सेलूत आज गौरव; नूतन विद्यालय सभागृहात कार्यक्रम 

चारठाणकर पुरस्कार : चिन्मयी सुमित यांचा सेलूत आज गौरव; नूतन विद्यालय सभागृहात कार्यक्रम 

परभणी : सेलू (जि.परभणी) येथील महिला मंडळाच्या वतीने‌‌ सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा २०२३ या वर्षासाठीचा अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘वीर महिला सौ.गीताबाई चारठाणकर पुरस्कार ‘ ज्येष्ठ सिने-नाट्य व‌ दूरदर्शन कलावंत चिन्मयी सुमित यांना शुक्रवारी, १६ जून रोजी प्रदान करण्यात येणार आहे. नूतन विद्यालयातील राजेंद्र गिल्डा सभागृहात दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजिका नंदिनी नरेंद्र चपळगावकर, तर प्रमुख अतिथी म्हणून माजलगाव येथील सिध्देश्वर महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त उपप्राचार्य स्नेहल पाठक उपस्थित राहणार आहेत. या वेळी ‘ महिलांची सुरक्षितता : काळाची गरज’ या विषयावर पाठक मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन महिला मंडळ व पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा विजया कोठेकर, सचिव ललिता गिल्डा, वर्षा डोंग्रजकर, डॉ.राजाभाऊ चारठाणकर, वामनराव वाईकर, बाबासाहेब चारठाणकर, वरुणा चारठाणकर, रजनी सुभेदार, करुणा कुलकर्णी, शुभदा चारठाणकर, वरुणा कुलकर्णी, रोहिणी कुलकर्णी, वसुधा खारकर, भाग्यश्री धामणगावकर व संयोजन समितीने केले आहे.‌ 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!