‘नीट’मधील यशाचा आनंद शाळेत येऊन साजरा; सेलूतील ओवी दडके,अभिजित आळणेचे नूतन विद्यालयात कौतुक

‘नीट’मधील यशाचा आनंद शाळेत येऊन साजरा; सेलूतील ओवी दडके,अभिजित आळणेचे नूतन विद्यालयात कौतुक

सेलू जि.परभणी :
“ही आवडते मज मनापासुनी शाळा,
लाविते लळा ही, जसा माउली बाळा…”
आचार्य प्र.के.अत्रे ( केशवकुमार) यांचे शाळेबद्दलचे नितांत प्रेम, आदर अधोरेखित करणारी ही काव्य रचना संस्मरणीय ठेवा आहे. याचीच प्रचिती सेलू येथील नूतन विद्यालयात गुरुवारी (१५ जून) पुन्हा अनुभवायला आली. शाळेचे माजी विद्यार्थी अभिजित भाऊसाहेब आळणे व ओवी उदय दडके यांनी वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेतील (NEET) घवघवीत यशाचा आनंद शाळेत येऊन साजरा केला. शाळेच्या वतीने दोन्ही गुणवंतांचे कौतुक करण्यात आले.ओवी दडके हीने ७२० पैकी ६१३, तर अभिजित आळणे याने ६२६ गुण मिळवून वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. या वेळी राष्ट्रीय योगासन स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणार्‍या आणि महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळवून देणारी माजी विद्यार्थिनी शिल्पा पिंपळे तसेच; पुरस्कारप्राप्त क्रीडा शिक्षक सतीश नावाडे यांचाही सत्कार करण्यात आला.
राज्यशासनाच्या योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटपाला सुरुवात झाली. या वेळी या वेळी मुख्याध्यापक नारायण सोळंके, संतोष पाटील, के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, अशोक लिंबेकर, गणेश माळवे, काशिनाथ पल्लेवाड, भाऊसाहेब आळणे आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!