सेलूतील शुभम टाके यांचे नेट परीक्षेत यश; इंग्रजीमध्ये ९६.०६ पर्सेंटाइल
सेलू जि.परभणी : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंग्रजी विषय सहायक प्राध्यापक पदासाठीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) सेलू येथील शुभम शिवाजी टाके यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्यांना या परीक्षेत ९६.०६ पर्सेंटाइल आहे. शुभम टाके हे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. सेलू व परिसरातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा कौशल्याचे ते धडे देतात. त्यांचे वडील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहेत. नव्यायुगातील विद्यार्थ्यांना मातृभाषा म्हणून मराठी चांगली बोलता आली पाहिजे.परंतु; इंग्रजी भाषादेखील कौशल्य म्हणून अवगत करणे आवश्यक आहे,असे मत शुभम टाके यांनी व्यक्त केले. या यशाबद्दल शुभम टाके यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.