फोटो व्हायरलची धमकी देत मुलीवर अत्याचार; दोघाविरूद्ध सेलूत गु्न्हा
परभणी : मोबाईलमधील फोटो समाज माध्यमावर व्हायरल करून बदनामी करेल, अशा धमक्या देऊन बळजबरीने एका सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना सेलू (जि.परभणी) येथे घडली. पीडितेच्या तक्रारीनंतर या प्रकरणी सेलू ठाण्यात गुरुवारी, २२ जून रोजी रात्री उशीरा दोघांविरुध्द पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीर दादामिया कुरेशी, मोबीन अन्सारी (रा.सेलू), अशी आरोपीची नावे आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हळ, पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी भेट दिली. दोन्ही आरोपी पोलिसाच्या ताब्यात आहेत. सुनील अंधारे तपास करीत आहेत.
तरुणाच्या मृत्यूप्रकरणी तिघांविरुद्ध खूनाचा गुन्हा
परभणी : खर्चासाठी पैशांची मागणी केल्यानंतर देण्यास नकार दिल्याने आरोपींनी केलेल्या जबर मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तीन आरोपी विरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेलू शहरातील बाहेती मंगल कार्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत २१ जून रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. ज्ञानेश्वर उर्फ बाळू सुदाम शिंदे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी सखुबाई सुदाम शिंदे यांनी तक्रार दिली आहे. २१ जून रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ज्ञानेश्वर हा कामासाठी गेला होता. सायंकाळी घरी आल्यानंतर तो पोटात दुखत आहे, असे म्हणाला. विचारणा केल्यावर ज्ञानेश्वरने आरोपींनी पैशांची मागणी करत जबर मारहाण केली असल्याचे सांगितले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आरोपी शिवाजी जाधव, सोनू पवार, शेख इब्राहिम उर्फ इम्मु डॉन यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलीस अधीक्षक रागसुधा आर., उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हळ यांनी भेट दिली.
आज गुणगौरव सोहळा : सेलू,जिंतूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार; श्री नृसिंह प्रतिष्ठानचा उपक्रम