आज गुणगौरव सोहळा : सेलू,जिंतूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार; श्री नृसिंह प्रतिष्ठानचा उपक्रम
जिंतूरमध्ये कार्यक्रम, विविध क्षेत्रांत पदावर निवड झालेल्या यशवंताचाही होणार सन्मान
सेलू/परभणी : जिंतूर व सेलू तालुक्यातील इयत्ता १० वी, १२ वी व वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत उत्कृष्ट यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, तसेच विविध क्षेत्रात पदावर निवड झालेल्या यशवंताचा सत्कार समारंभ शनिवारी, २४ जून रोजी जिंतूर येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिंतूर येथील माऊली मंगल कार्यालयात सकाळी १०:०० वाजता हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय भांबळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक तथा लेखक शरद तांदळे, परभणी येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचे संचालक विठ्ठल कांगणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या निमित्ताने १० वी, १२ वी नंतर काय ? या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री नृसिंह प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रेक्षा भांबळे-बोराडे यांनी केले आहे.
‘सीईओ’चे आदेश : ‘ते’ बांधकाम सुरू करू नये; माजी आमदार भांबळे यांच्या तक्रारीनंतर नेमली चौकशी समिती