‘सीईओ’चे आदेश : ‘ते’ बांधकाम सुरू करू नये; माजी आमदार भांबळे यांच्या तक्रारीनंतर नेमली चौकशी समिती

‘सीईओ’चे आदेश : ‘ते’ बांधकाम सुरू करू नये; माजी आमदार भांबळे यांच्या तक्रारीनंतर नेमली चौकशी समिती

जिंतूर तालुक्यातील रस्ता सुरक्षा भिंत बांधकामाच्या निविदेत बनावट कागदपत्रे वापरल्याची तक्रार

जिंतूर/परभणी  : जिंतूर तालुक्यातील बोरी- वर्णा-निवळी रस्ता सुरक्षा भिंत बांधकाम कामामध्ये पृथ्वी कंन्सट्रक्शन नांदेड यांच्या परस्पर बनावट कागदपत्रे तयार करून निविदा मागे घेतल्याचा प्रकार घडला आहे. सदर प्रकरणी माजी आमदार विजय भांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना लेखी तक्रार देऊन सदर प्रकरणी चौकशी करून दोषीविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे या आशयाचे पत्र २० जून रोजी दिले होते. याची गंभीर दखल घेत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी सदरील कामाचे कार्यारंभ आदेशाला २१ जून रोजी स्थगिती दिली आहे.
या प्रकरणावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रार काय आहे…

जिंतूर तालुक्यातील बोरी, वर्णा, निवळी रोडच्या टेंडर प्रक्रियेत बनावट कागदपत्रे तयार करून ते शासकीय कामाकरिता वापरले प्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा, अशी तक्रार माजी आमदार विजय भांबळे यांनी २० जून रोजी केली आहे. बोरी – वर्णा – निवळी रोडची निविदा पृथ्वी कंस्ट्रक्शन यांनी भरलेली आहे. निविदा भरण्याची शेवटची मुदत 08/05/2023 पर्यंत होती तसेच; आर्थिक दर निविदा (Financial open) स्वीकृती दि. 15/06/2023 रोजी केलेली आहे सदर टेंडर मध्ये टेक्नीकल ओपन दि.17/06/2023 रोजी केलेले आहे. या प्रक्रियेत पृथ्वी कंस्ट्रक्शन या कंत्राटदाराचा बनावट लेटरपॅड व शिक्का बनवुन बनावट सहीनिशी निविदेमधुन माघार घेत असल्याबाबतचे पत्र सादर केलेले आहे.

सदरील कंत्राटदाराने याबाबत 20/06/2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे. वास्तविक पाहता सदरील कंत्राटदाराला तांत्रीक छाननी वेळेस समक्ष बोलवुन किंवा इमेल द्वारे कळविणे अभिप्रेत आहे. तसे न करता जिल्हा परिषद मधील अजिंक्य पवार अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. परभणी ऊढाणशीवे कार्यकारी अभियंता (बा) जि.प.परभणी, तसेच शरन पाटील निविदा वरीष्ठ सहाय्यक निवीदा शाखा जि.प.परभणी यांनी व पात्र करण्यात आलेल्या तिन्ही कंत्राटदारांनी संगनमत करून बनावट दस्तऐवज तयार केले व ते बनावटी आहेत, हे माहीत असतांनासुद्धा ते निविदा प्रक्रीयेमध्ये वापरले. त्याप्रकरणी वरील सर्व दोषी असलेल्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांचेवर बनावट दस्ताऐवज तयार करणे, निविदा प्रक्रीयेसंदर्भात सर्व शासन नियमांचे पायमल्ली करणे व पदाचा दुरूपयोग करणे या प्रकरणी दोषी असलेल्या सर्व लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.अशा आशयाचे लेखी पत्र भांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी व पोलीस अधीक्षक, परभणी यांना दिलेले आहे.


उद्बोधन : प्रगत शिक्षणासाठी शिक्षकांनी सज्ज व्हावे; जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ.प्राची साठे यांचे आवाहन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!