Curious Kids : परळी येथील नवीन शाखेचे डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती 

Curious Kids : परळी येथील नवीन शाखेचे डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती 

हास्य जत्रा टीव्ही फेम समीर चौगुले, चेतना भट यांच्या भन्नाट विनोदी कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद 

Curious Kids

परळी : बीड जिल्ह्यातील परळी येथे क्युरिअस किड्सच्या नवीन शाखेचे उद्घाटन सॅनरो एज्युकेअर प्रायव्हेट लिमिटेड संचालित क्युरियस किड्सचे चेअरमन डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते बुधवारी, २१ जून रोजी झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंदूलालजी बियानी, जुगल किशोर लोहिया, रतन कोठारी, डॉ.शालिनी कराड, सुशील कराड, राकेश चांडक,‌ प्रगती क्ष्रीरसागर, रोझ व परळी येथील क्युरीयस किड्स या शाखेच्या पूजा सचिन सारडा व शितल पवन पणपलिया आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना डॉ.संजय रोडगे म्हणाले की, क्युरियस किड्स ही जगातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या फिनलंड या देशाच्या शिक्षण पद्धतीवर आधारित असून संपूर्ण अभ्यासक्रम हा कृतीयुक्त शिक्षण (ऍक्टिव्हिटी बेस) देणारा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम शिकत असताना विद्यार्थ्यांना आपण शाळेमध्ये आलो आहोत. काहीतरी पाठांतर करत आहोत. याची अजिबात जाणीव होत नाही. या शिक्षण पद्धती अंतर्गत विद्यार्थी खेळता खेळता शिकतो. या नावीन्यपूर्ण, कृतीयुक्त व उपक्रमशील शिक्षण पद्धतीचा परिसरातील पालकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन केले.

या वेळी चिमुकल्या बालकांसाठी व पालकांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम हास्य जत्रा टीव्ही फेम समीर चौगुले व चेतना भट यांचा भन्नाट विनोदी कार्यक्रम झाला. या प्रसंगी चिमुकले विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या फिनलंड या देशाच्या ” शिक्षण पद्धतीवर आधारित असून संपूर्ण अभ्यासक्रम हा कृतीयुक्त शिक्षण (ऍक्टिव्हिटी बेस) देणारा अभ्यासक्रम आहे. या नावीन्यपूर्ण, कृतीयुक्त व उपक्रमशील शिक्षण पद्धतीचा परिसरातील पालकांनी अवश्य लाभ घ्यावा.” – डॉ.संजय रोडगे, चेअरमन, क्युरियस किड्स

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!