महामार्गाच्या बोगस कामाविरूद्ध सेलूत आंदोलन
सेलू जि.परभणी : राष्ट्रीय महामार्ग ५४८ (ब) अंतर्गत सेलू ते डिग्रसपाटी या सहा किलोमीटर रस्त्याचे काम विलंबाने व अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या बोगस कामाविरूद्ध संतप्त सेलूकरांच्या वतीने सोमवारी, २६ जून रोजी सेलू (जि.परभणी) येथील रायगड काॅर्नरवर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गुजरात येथील सरस्वती कन्स्ट्रक्शन कंपनी हे काम करत आहे. गेल्या चार महिन्यांपासून रस्ता उखडून ठेवला आहे. रहदारीला प्रचंड त्रास होत आहे. पुल, नाल्या व रस्ता भरावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, सरस्वती कंन्सट्रक्शनला दिलेले काम व त्याचा परवाना रद्द करावा. या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. कार्यकारी अभियंता विक्रांत शिरभाते यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी सभापती अशोक काकडे, उद्योजक नंदकिशोर बाहेती, मनीष कदम, डाॅ.विलास मोरे, किशोर जोशी, नामदेव डख, सुधाकर रोकडे, विशाल देशमुख, रघुनाथ बागल, मुस्ताक रब्बानी, विनोद तरटे, सुधाकर पवार, शेख दिलावर, गौस लाला, इम्तियाज अलीखान, सतीश जाधव, नरसिंग हरणे, दत्तूसिंग ठाकूर, वैभव वैद्य, शेख खाजा, जगन्नाथ कटारे, विजय नाईकनवरे, कॉम्रेड बाबुभाई, अशोक उफाडे, परवेज सौदागर, डिगांबर पवार यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त होता.आदींसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सेलू ते डिग्रसपाटी दरम्यान सुरू असलेले सहा किलोमिटर अंतराचे राष्ट्रीय महामार्गाचे काम सरस्वती कन्स्ट्रक्शन कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर आले असून, यापुढे कामात गुणवत्तापूर्ण सुधारणा व विहीत मुदतीच्या आत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता विक्रांत शिरभाते यांनी दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
रास्तारोको : चिकलठाणा फाट्यावर शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन ; बाजारभावाने जमीनीचा मोबदला देण्याची मागणी