ईद मुबारक : सेलू शहरात बकरी ईद उत्साहात साजरी; विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव
सेलू : सेलू शहर व परिसरात मुस्लिम समाज बांधवांनी गुरुवारी, २९ जून रोजी ईद-उल अजाह अर्थात बकरी ईदच सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने सकाळी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. विविध भागातील मस्जिदमध्येही नमाज अदा करण्यात आली. इस्लामिक कॅलेंडरनुसार १२ व्या महिन्यात धू-अल-हिज्जाच्या १० तारखेला बकरी ईद साजरी केली जाते. रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना संपल्यानंतर सुमारे ७० दिवसांनंतर बकरी ईद येते. या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व असते. इस्लाम धर्मानुसार रमजानच्या सेलिब्रेशननंतर बकरी ईदचे विशेष महत्त्व असते. या दिवसाचे औचित्य साधून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शहरातील विविध सामाजिक संघटना, संस्था पदाधिकारी, नागरिकांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव करीत मुस्लिम बांधवांप्रती स्नेहभाव प्रगट केला.
बाळगोपाळांच्या दिंड्यांनी सेलूनगरी दुमदुमली; स्वागत, फराळपाणी वाटपाचा उत्साह