बाळगोपाळांच्या दिंड्यांनी सेलूनगरी दुमदुमली; स्वागत, फराळपाणी वाटपाचा उत्साह

बाळगोपाळांच्या दिंड्यांनी सेलूनगरी दुमदुमली; स्वागत, फराळपाणी वाटपाचा उत्साह

बाळगोपाळांच्या दिंड्यांनी सेलूनगरी दुमदुमली; स्वागत, फराळपाणी वाटपाचा उत्साह

सेलू : आषाढी एकादशीच्या निमित्ताने शहरातील विविध शाळांनी गुरुवारी, 29 जून रोजी उत्साहात दिंडीचे आयोजन केले होते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ‘ चा गजर, बालवारकर्‍यांनी टाळ, मृदंग, वीणा चिपळ्यांच्या साथीने सादर केलेल्या पावल्या, भजन, गवळण, भारुडाने अवघी सेलूनगरी दुमदुमली.‌  ठिकठिकाणी दिंड्यांचे उत्साहात स्वागत झाले.  विविध पक्ष, सामाजिक संघटना, संस्थांकडून फराळपाणी वाटपाचा उत्साह दिसून आला.
श्री विठ्ठल – रुक्मिणी, संतांच्या वेशभूषा, वारकरी पेहराव, ढोलताशे, लेझीम पथकांनी वातावरणात चैतन्य फुलविले होते. क्रांतीचौकात साईबाबा नागरी बँकचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांच्या वतीने दिंड्यांचे स्वागत करून फराळाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी विनोद तरटे, संभाजी पवार, आकाश अस्वले, नृसिहं हरणे, सचिन राऊत, दत्तात्रय पौळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

बाळगोपाळांच्या दिंड्यांनी सेलूनगरी दुमदुमली; स्वागत, फराळपाणी वाटपाचा उत्साह
श्री संत गोविंद बाबा चौकामध्ये श्री संत गोविंद बाबा मित्र मंडळ व विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करून फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मारोती चव्हाण, प्रभाकर सुरवसे, राजेंद्र पवार, मिलिंद सावंत, साईराज बोराडे, शंकर राऊत, गौतम धापसे आदींसह मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. शहरात ठिकठिकाणी विविध पक्ष, मित्रमंडळ, सामाजिक व सेवाभावी संघटना, संस्थांनी विविध दिंड्यांचे उत्साहात स्वागत केले. फराळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. शालेय विद्यार्थी, शिक्षक, विविध पक्ष, सामाजिक संस्था, मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, भाविक मोठ्या संख्येने उत्सवामध्ये सहभागी झाले होते.

आषाढी एकादशी

दरम्यान, आषाढी निमित्ताने शहरातील विविध भागातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह, ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, श्री साईबाबा मंदिर, श्री गजानन महाराज मंदिर, श्री शंकरलिंग मंदिरासह विविध शिवालयांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले. क्रांती फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पांडुरंग पूजन व वृक्षारोपण कार्यक्रम झाला. अध्यक्ष पोर्णिमा जोहीरे, संतोष गटकळ, सुवर्ण कांबळे, छाया पाचलेगाकर, कांचन हिवाळे, मीना लोंढे, शुभांगी सांगळे ॲड.रोहिणी बोराडे, डॉ.घुगे, कल्पना कपाळे आदींची उपस्थिती होती. श्रीराम जन्मोत्सव समिती सेलूतर्फे शालेय दिंडीचे स्वागत व फराळ वाटपाचा कार्यक्रम क्रांती चौकात झाला.

 

आषाढी एकादशी


ईद मुबारक : सेलू शहरात बकरी ईद उत्साहात साजरी; विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!