Manipur Voilence : मणिपूर घटनेचा सेलूतील महिलांतर्फे तीव्र निषेध

Manipur Voilence : मणिपूर घटनेचा सेलूतील महिलांतर्फे तीव्र निषेध

सेलू : मणिपूर घटनेचा सेलू येथील सर्व पक्षीय सामाजिक संस्था मधील महिलांनी जाहीर निषेध केला. घटनेतील आरोपीस लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी २१ जुलै रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली. आपल्या देशातील नारीला देवता आदिशक्ती, असे संबोधले जाते. नारीच्या संदर्भात होत असलेल्या मणिपूर घटनेमुळे भारत देशाला काळिमा फासला गेला आहे. मनिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ सेलू येथील यांना क्रांती फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार दिनेश झांपले यांना निवेदन देण्यात आले. क्रांती फाउंडेशनच्या अध्यक्ष पोर्णिमा जोहीरे, कल्पना कठाळे तसेच सिमाशेख, सरोज पाटोळे शुभांगी सांगळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मल लिपणे यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!