Manipur Violence : मणिपूर घटनेतील आरोपींना देहदंडाची शिक्षा द्या; गंगाखेड येथील विविध पक्षांची मागणी

Manipur Violence : मणिपूर घटनेतील आरोपींना देहदंडाची शिक्षा द्या; गंगाखेड येथील विविध पक्षांची मागणी

गंगाखेड : मणिपुर राज्यात दोन महिलांची नग्न धींड काढण्यात आली. हा प्रकार सबंध राष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारा आहे. या घटनेतील आरोपींना तात्काळ देहदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी गंगाखेड येथील विविध पक्षांनी केली आहे.
या संदर्भात शुक्रवारी, २१ जुलै रोजी गंगाखेड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव, भाकपाचे संयोजक कॉम्रेड योगेश फड, ॲड.राजू देशमुख, सिद्धार्थ भालेराव, शिवराज पैठणे, गोपीनाथराव भोसले, रोहिदास लांडगे, दस्तगीर सय्यद आदी़सह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Jalna-Naned Highway : मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे २६ जुलैपासून आंदोलन; मुंबईतील आझाद मैदानावर करणार जोरदार धरणे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!