Dance Competition : ‘प्रिभूषण’ने गंगाखेडकरांची मान उंचावली : गोविंद यादव; राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेला मोठा प्रतिसाद
गंगाखेड : प्रिभूषण नृत्य अकादमीच्या माध्यमातून परिसरात उत्तम कलावंत घडवण्याचे काम सतत सुरू असते. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. शहरात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेची एक चांगली परंपरा सुरू करून प्रिभूषणने कला क्षेत्रात गंगाखेडकरांची मान उंचावली आहे, असे प्रतिपादन तालुका कॉंग्रेस तथा साईसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी केले.
येथील पूजा मंगल कार्यालयात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा ऊत्साहात झाली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात गोविंद यादव प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे होते. पोदार लर्न स्कूल परळी वैद्यनाथचे सचिव बद्रिनारायण बाहेती, माजी नगरसेविका प्रतिमाताई वाघमारे, नाट्य दिग्दर्शक सुनील ढवळे, नादबिंदूचे गोपी मुंडे, ॲड. लिंबाजी घोबाळे, डॉ.समीर गळाकाटू, प्रा.डॉ.शिवाजी गाडे, रिपाईचे दिलीप गांधरे, प्रा.डॉ.अंकुश वाघमारे, कलीम थेरकर, पत्रकार भागवत जालाले आदींची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
राज्यातल्या विविध भागांमधून आलेल्या १२० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. यात मोठ्या गटात प्रथम ज्योती गोरे, द्वितीय प्रदीप गुप्ता (मुंबई), तृतीय सोनू वाघमोडे ( अक्कलकोट), तर उतेजनार्थ आशिष ओस्कलवार ( नांदेड) यांनी यश संपादन केले. लहान गटात प्रथम माही घोडराव (बीड), द्वितीय मानवी पतंगे (आंबेजोगाई), तृतीय संजना बिरादार ( अक्कलकोट) उत्तेजनार्थ संध्या मुजमुले (माजलगाव बीड) यांनी पारितोषिक पटाकाविले. प्रिभूषण अकादमीचे भूषण गाडे, प्रियंका आवचार-गाडे यांनी मान्यवरांसह स्पर्धकांचे स्वागत केले.
परीक्षक म्हणून डॉ.सिद्धार्थ मस्के, वर्षा जोशी, गंगा गवळी यांनी काम पाहिले. नागेश बोरीकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार भूषण गाडे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रमेश गायकवाड, प्रतीक खंदारे, प्रतीक घोबाळे, विकास वाघमारे प्रशांत खंदारे, विशाल उफाडे ,संदीप राठोड, कार्तिक खैरे, अजय अवचार, सुशांत धर्मेकर, कपिल भरणे, शेख जावेद, श्याम घोबाळे, विजय आवचार आदींनी परीश्रम घेतले.