‘मेरी मिट्टी, मेरा देश’ : सेलूतील स्वातंत्र्य सैनिक भगीरथ गेना यांचा सन्मान

Amrit Bharat Station Scheme : सेलू स्थानकाच्या २३ कोटींच्या पुनर्विकासकामांचा रविवारी शुभारंभ; पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद 

‘मेरी मिट्टी, मेरा देश’ : सेलूतील स्वातंत्र्य सैनिक भगीरथ गेना यांचा सन्मान

परभणी : केंद्र शासनाच्या ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या उपक्रमाला जिल्हाभरात मंगळवारपासून (९ ऑगस्ट) उत्साहात प्रारंभ झाला आहे. या उपक्रमांतर्गत सेलू (जि.परभणी) येथील ९५ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक भगीरथ गेना यांची बुधवारी, ९ ऑगस्ट रोजी तहसीलदार दिनेश झांपले व पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी घरी जाऊन भेट घेतली. त्यांचा यथोचित सन्मान केला. सरकारच्या वतीने आलेली वस्त्रभेट देण्यात आली. तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद आष्टीकर, चंद्रशेखर मुळावेकर, विजय बोधले, रेवा कुंदनानी आदींची उपस्थिती होती.

परभणीत पंचप्रणाची शपथ

'मेरी मिट्टी, मेरा देश' : सेलूतील स्वातंत्र्य सैनिक भगीरथ गेना यांचा सन्मान

परभणी : केंद्र शासनाच्या ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या उपक्रमाला जिल्हाभरात मंगळवारपासून (९ ऑगस्ट) उत्साहात प्रारंभ झाला आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सकाळी राजगोपालचारी उद्यानातील मुक्तीसंग्राम स्मृतिस्थळावर ध्वजारोहण तसेच शहीद जवानांच्या शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांना पंचप्रणाची शपथ दिली.
अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, दत्तु शेवाळे, गोविंद रणवीरकर, किशोर परदेशी, प्रदीप जगताप, तहसीलदार सुरेश घोळवे, अमित घाडगे, श्रीराम बेंडे, आर. एन.पवळे, प्रशांत वाकोडकर, शेख वसीम आदी मान्यवरांची उपस्थिती होती. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ उपक्रम महानगरपालिकेसह नगरपालिका आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. राजगोपालचारी उद्यानात जिल्हाधिकारी गावडे यांच्या उपस्थितीत शहीद जवानांच्या शिलाफलकाची उभारणी करून त्यावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हीजन २०४७ चा संदेश, शहीद विरांची नावे कोरण्यात आली आहेत. याप्रसंगी वीरपत्नींचा शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हाधिकारी गावडे यांनी सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेत उपक्रमाची सुरुवात केली. जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींपैकी ६४२ ठिकाणी शिलाफलक लावण्याचे काम सुरू आहे. तसेच ७०४ ग्रामपंचायतींमध्ये अमृत वाटीकांच्या जागा निश्चित
करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ लाख ६३ हजार ४३९ राष्ट्रध्वज जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असून, भारतीय डाकघरामध्ये नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मेरी मिट्टी, मेरा देश’ उपक्रमांतर्गत सेलू (जि.परभणी) येथील ९५ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक भगीरथ गेना यांची बुधवारी, ९ ऑगस्ट रोजी तहसीलदार दिनेश झांपले व पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी घरी जाऊन भेट घेतली. त्यांचा यथोचित सन्मान केला. सरकारच्या वतीने आलेली वस्त्रभेट देण्यात आली. तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद आष्टीकर, चंद्रशेखर मुळावेकर, विजय बोधले, रेवा कुंदनानी आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!