Sports : सेलू तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २८ ऑगस्टपासून; खेळाडूंना सहभागाचे आवाहन 

Sports : सेलू तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २८ ऑगस्टपासून; खेळाडूंना सहभागाचे आवाहन 

सेलू : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद परभणी यांच्या संयुक्त विदयमाने व गटशिक्षणाधिकारी पंचायत समितीच्या वतीने सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या तालुका शालेय क्रीडा स्पर्धेची सन 2023-24 या वर्षात क्रीडा स्पर्धेची प्रवेशीका ऑनलाईन पध्दतीने होणार असल्यामुळे खेळाडूची व वेळेच्या आत विहीत नमुन्यात ऑनलाईन सादर करून आपला विविध स्पर्धेतील प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात नूतन विद्यालयात नुकतीच बैठक झाली. उपमुख्याध्यापक एस.व्ही.पाटील, चंद्रशेखर नावाडे,  विजयसिंग राजपूत, गणेश माळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुभाष मोहेकर, आभार प्रदर्शन किशोर डोके यांनी केले. बैठकीसाठी सतिश नावाडे, प्रंशात नाईक, राम लगड,  शेख ,यु.आर.झिंजान, प्रभू शिंदे, नितीन खाकरे, संतोष शिंदे, सगीर फारोकी, रामेश्वर कातकडे, बालाजी मुळी, प्रसाद ठोंबरे, सूरज शिंदे, अमर सुरवसे, अमर ठाकूर आदी क्रीडा शिक्षकांची उपस्थिती होती. सहभागासाठी तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे (9423324907) यांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले.
सेलू तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा वेळापत्रक (वयोगट 14, 17, 19 वर्षे मुले / मुली ) : 1) योगासन 29 ऑगस्ट ,नूतन महाविद्यालय, सेलू, 2) बुध्दीबळ 28 ऑगस्ट, न्यू मॉर्डन इंग्लीश स्कूल, सेलू, 3) कुस्ती 31 ऑगस्ट नूतन महाविद्यालय, सेलू, 4) क्रिकेट 1 ते 2 सप्टेंबर नूतन महाविद्यालय, सेलू, 5) कॅरम, 4 सप्टेंबर नूतन महाविद्यालय, सेलू, 6) कबड्डी,7 ते 8 सप्टेंबर प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू, रवळगांव रोड, 7) बॅडमिंटन 9 सप्टेंबर तालुका क्रीडा संकुल, सेलू, 8) खो-खो 12 ते 13 सप्टेंबर प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू, रवळगांव रोड, 9) व्हॉलीबॉल 18 सप्टेंबर प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू रवळगांव रोड. 10) ॲथलेटिक्स 25 ते 26 सप्टेंबर ,नूतन महाविद्यालय, सेलू


Art of Living : ‘हर घर ध्यान’ मध्ये प्रिन्सचे विद्यार्थ्यांसह शिक्षक तल्लीन

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!